Jio-Airtel-Vodafone चे जबरदस्त प्लान ! रोज 4GB पर्यंत डेटा, फ्री कॉलिंग, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम कंपन्या युजर्संना अनेक बेस्ट प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. मोठी वैधता असलेले प्लान अनेकांना पसंत पडत आहेत. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन कंपनीचे जबरदस्त प्लान आहेत. या प्लानमध्ये 84 दिवसांची वैधता तसेच रोज 4जीबी पर्यंत डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स ऑफर केले जात आहेत. जाणून घ्या प्लानची आणखी माहिती

रिलायन्स जिओचा 599 रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानमध्ये रोज 2जीबी या प्रमाणे एकूण 168 जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी या प्लानमध्ये 3 हजार एफयूपी मिनिट्स मिळतात. रोज 100 फ्री एसएमएस सोबत या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

वोडाफोनचा 699 रुपयांचा प्लान
वोडाफोनच्या या प्लानमध्ये 84 दिवसांची वैधता आणि रोज 4जीबी (2जीबी प्लस 2 जीबी) डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे. दररोज 100 फ्री एसएमएस सोबत या प्लानमध्ये वोडाफोन प्ले आणि झी 5 चे सब्सक्रिप्शन दिले जाते.

एअरटेलचा 698 रुपयांचा प्लान
एअरलटेलच्या या प्लानमध्ये 84 दिवसांची वैधता आणि रोज 2जीबी डेटा दिला जातो. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केली जाते. तसेच 100 फ्री एसएमएसचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये विंक म्यूझिक आणि एअरटेल एक्सट्रिमचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. याशिवाय फास्ट टॅग खरेदीवर 150 रुपायंचा कॅशबॅक देखील मिळतो.