Jio Vs Airtel Vs Vodafone : 149 चा कोणता प्लॅन चांगला, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – टेलिकॉम कंपन्या जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करुन घेण्यासाठी वाजवी दरातले नवे प्रीपेड प्लॅन जाहीर करत आहेत. आता रिलायन्स जिओ, वोडाफोन आणि एअरटेल ने ग्राहकांसाठी स्वस्त प्लॅन आणले आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एक महिन्याची वैधता मिळते. आज आम्ही तुम्हाला १४९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची तुलना सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

रिलायन्स जीओचा १४९ रुपयांचा प्लॅन

१४९ रुपयांचा हा जीओचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना २४ दिवसांची वैधता मिळते. तसेच रोज १ जीबी डेटाचा प्लॅन असून, ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटा प्राप्त होतो. कॉलिंगमध्ये जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. इतर नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी ३०० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज ग्राहकांना १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

वोडाफोनचा १४९ रुपयांचा प्लॅन

वोडाफोनच्या या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. त्याच्यामध्ये ग्राहकांना २ जीबी डेटा मिळतो. तसेच कंपनी १ जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. याची वैशिष्ट्ये म्हणजे सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. ग्राहकांना ३०० एसएमएस आणि वोडाफोन प्ले तसेच झी ५ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन प्राप्त होते.

एअरटेलचा १४९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा हा प्लॅन जवळपास वोडाफोन सारखाच आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. त्यात एकूण २ जीबी डेटा आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा प्राप्त होते. यामध्ये ग्राहकांना ३०० एसएमएस मिळतात. तसेच Airtel Xstream व विंक म्युझिकचे सब्सक्रिप्शन आणि फ्री हेलोट्यून्सची सुविधा देण्यात आली आहे.

सर्वात जास्त कोणत्या प्लॅनमध्ये फायदा

ग्राहकांना जर अतिरिक्त डेटा हवा असेल तर जीओचा प्लॅन हा जास्त फायदेशीर ठरतो. ज्यामध्ये २४ जीबी डेटा मिळतो. तसेच जर तुम्हाला जास्त वैधता आणि अनलिमिटेड कॉलिंग पाहिजे असेल तर वोडाफोनचा प्लॅन चांगला पर्याय असू शकतो.