Airtel vs Jio : कोणाचा 129 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बेस्ट ? जाणून घ्या फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअरटेल आणि जिओ या दोन टेलिकॉम कंपन्यांत नेहमीच मोठी चुरस पाहायला मिळते. दोन्ही कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक योजना उपलब्ध करून देतात. इतर अनेक योजनांबरोबरच जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या 129 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. तसेच दोन्ही कंपन्यांची 29 रुपयांची प्रीपेड योजना अशा ग्राहकांसाठी आहे जे परवडणारे पर्याय शोधतात. जरी दोन्ही कंपन्यांच्या या योजनेची किंमत एक आहे, परंतु त्यांचे फायदे निश्चितच वेगळे आहेत. जाणून घेऊया या दोन्ही कंपन्याच्या योजनांच्या फायद्याविषयी….

एअरटेलच्या 129 रुपयांच्या प्रीपेड योजनेत अमर्यादित व्हॉईस कॉल, 1 जीबी विनामूल्य डेटा आणि 300 एसएमएस देण्यात आले आहेत. ही योजना 24 दिवसांच्या वैधतेसह येते. तर जिओच्या 129 रुपयांच्या योजनेत ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल, 2 जीबी डेटा आणि 300 एसएमएस 28 दिवसांच्या वैधतेसह दिले आहेत. म्हणजेच जिओच्या योजनेत 4 दिवस अतिरिक्त वैधता आणि 1 जीबी अतिरिक्त डेटा देण्यात आला आहे. त्याचबरोबर Jio मधील 2 जीबी डेटा मर्यादेनंतर, वेग कमी होऊन 64 Kbps होतो . त्याच वेळी, ग्राहकांना एअरटेलच्या डेटा मर्यादेनंतर प्रति मेगाबाइट 50p चार्ज केले जाते.

याशिवाय एअरटेलच्या 129 रुपयांच्या प्रीपेड योजनेत अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, हॅलोट्यून्स, विंक म्युझिक आणि एअरटेल एक्सट्रीम बेनिफिट्सही देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे Jio त्याच्या 129 रुपयांच्या प्रीपेड योजनेत JioTV आणि JioCinema सारख्या अ‍ॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन देण्यात येते.