300 रुपयांपेक्षा कमी आहेत Airtel आणि Vodafone Idea चे शानदार प्लॅन, मिळेल 4GB पर्यंत डेटा, फ्री कॉलिंग

नवी दिल्ली : फोन रिचार्जच्या वेळी आपल्याला असा प्लॅन हवा असतो, जो कमी किमतीसह जास्त डेटा आणि कॉलिंगसह अ‍ॅडिशनल बेनिफिट ऑफर करत असेल. सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या एकापेक्षा एक स्वस्त प्लॅन सादर करत आहेत. टेलिकॉम कंपन्यामध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत ग्राहकांचा खुप फायदा होत आहे. एयरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या अशा प्लॅनबाबत जाणून घेवूयात ज्यांची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहेत आणि यामध्ये 4जीबी पर्यंत डेटा मिळू शकतो…

आयडियाचा प्लॅन – वोडाफोन-आयडिया म्हणजे व्हीआय आपल्या युजर्सला 299 रुपयांचा शानदार प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी 2जीबी डेटा मिळत आहे. परंतु, कंपनी सध्या हा प्लॅन डबल डेटा ऑफर अंतर्गत उपलब्ध करत आहे.

299 रुपयांत मिळवा डेली 4जीबी डेटा
आता हा प्लॅन रिजार्च करणार्‍या यूजर्सला रोज 4 जीबी डेटा मिळत आहे. हा प्लॅन अनलिमिटेड फ्री कॉलिंग बेनिफिटसह येतो. वोडाफोन-आयडियाच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांपर्यंत आहे. यामध्ये ग्राहकांना रोज 100 फ्री एसएमएस सुद्धा मिळत आहे. इतकेच नाही या प्लॅनमध्ये अ‍ॅडनिशनल बेनिफिट म्हणून डेटा रोल ओव्हरचा फायदा सुद्धा दिला जात आहे.

तसेच टेलिकॉम कंपनी एयरटेलच्या अशा प्लॅनमध्ये यूजर्सला रोज 2 जीबी डेटा मिळेल. एयरटेलच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यामध्ये देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकता.

एयरटेलच्या 298 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनेक फायदे
याशिवाय अ‍ॅडिशनल बेनिफिट म्हणून एयरटेल आपल्या या प्लॅनमध्ये यूजर्सला रोज 100 फ्री एसएमएस आणि एयरटेल एक्सट्रीम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे फ्री सबस्क्रीप्शन देत आहे. तर या प्लॅनच्या सबस्क्रायबर्सला फास्टॅग खरेदीवर 150 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. याशिवाय प्राइमचा मोबाइल एडिशन फ्री ट्रायल सुद्धा देत आहे, ज्यामध्ये ग्राहक 20 दिवसांसाठी प्राइम व्हिडिओची फ्री ट्रायल मिळवू शकतात.