Airtel चा सर्वात ‘स्वस्त’ प्लॅन, ‘वर्क फ्रॉर्म होम’साठी तब्बल 164 GB डेटा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – आपली प्रतिस्पर्धा असलेल्या कंपनीला टक्कर देण्यासाठी Airtel कंपनीने एक खास प्लॅन बाजारात आणला आहे. रिलायन्स जिओ स्वस्तात जास्त जीबी डेटा देत असल्यानं आणि वोडाफोन तुलनेनं महाग असल्यानं Airtel ने या दोन्ही स्पर्धक असलेल्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एक खास प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे.

देशातील लॉकडाऊनची वाढणारी परिस्थिती पाहता कंपनीकडून Work frome home करणाऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी धासू असे ती वेगवेगळे प्लॅन सादर केले आहेत. या तीनही प्लॅन ची वैधता ८४ दिवसांची असेल. ३७९, ५९८, ६९८ असे हे तीन टेरिफ प्लॅन आहेत. यात काय वैशिष्ट्य आहेत आणि काय खास मिळणार आहेत, ते जाणून घेऊ.

एअरटेल ३७९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या या प्लॅन मध्ये ग्राहकांना इतर नेटवर्कसाठी ८४ दिवस अनलिमिटेड कॉलिंग, ६ जीबी डेटा तसेच १०० SMS मिळतील. जे ग्राहक डेटा कमी आणि कॉलिंग सेवेचा जास्त वापर करतात. त्यांच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय ZEE 5 प्रीमियम, Airtel Xstream प्रीमियम आणि Wynk music अँपच सब्स्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.

एअरटेल ५९८ रुपयांचा प्लॅन

यामध्ये ग्राहकांना एअरटेल ते इतर नेटवर्कसाठी ८४ दिवस अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १.५ जीबीचा डेटा आणि १०० SMS मिळणार आहे. जे ग्राहक कॉलिंग सेवेचा जास्त लाभ घेतात त्यांच्यासाठी हा प्लॅन बेस्ट असल्याचं कंपनीने म्हटलं. तसेच ZEE 5 प्रीमियम, Airtel Xstream प्रीमियम आणि Wynk music अँपच सब्स्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.

एअरटेल ६९८ रुपयांचा प्लॅन

या प्लॅन मध्ये ग्राहकांना एअरटेल ते इतर नेटवर्कसाठी ८४ दिवस अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा १०० SMS मिळणार आहे. जे ग्राहक डेटा आणि कॉलिंग सेवेचा जास्त लाभ घेतात त्यांच्यासाठी हा प्लॅन बेस्ट असल्याचं कंपनीने सांगितलं. त्याशिवाय ZEE 5 प्रीमियम, Airtel Xstream प्रीमियम आणि Wynk music अँपच सब्स्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like