आराध्या बच्चनने क्लिक केला अभिषेक आणि ऐश्वर्याचा स्पेशल फोटो… सोशलवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. 20 एप्रिल 2007 रोजी बच्चन घराण्याच्या प्रतिक्षा निवास येथे दोघांचं लग्न झालं होतं. अभिषेक आणि ऐश यांच्या लग्नाला आज 12 वर्ष पूर्ण झाले आहेत. सध्या अभिषेक आणि ऐश हे दोघे मालदीव येथे आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांची एकुलती एक मुलगी आराध्याही त्यांच्या सोबत आहे. आराध्याने त्यांचा एक छानशा फोटोही काढला आहे. सध्या हा फोटो सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा व्हायरल होणारा हा फोटो चाहत्यांना हा फोटो विशेष आडवला आहे. आणि चाहत्यांकडून या फोटोचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे.

ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आराध्याने काढलेला त्यांचा स्पेशल क्लिक शेअर केला आहे. या फोटोला तिने एक छान असं कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये ऐश्वर्याने म्हटले आहे की, “आमची ही साथ आमच्या जीवनातील दिव्य प्रकाशाने कॅमेऱ्यात कैद केली आहे. लव्ह यू आराध्या.” असे तिने लिहिले आहे.

View this post on Instagram

Happy New Year. 🥂

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

या फोटोत ऐश्वर्या निळ्या रंगाचा ड्रेस घातला असून यात ती खूपट सुंदर दिसत आहे. अभिषेक अलगत ऐश्वर्याला बिलगल्याचे फोटोत दिसत आहे. याआधी अभिषेकने ऐश्वर्याचा एक फोटो इन्स्टावर शेअर केला होता. त्यात ‘हनी अँड द मून’ असं कॅप्शन दिलं होतं.

या फोटोत दिसत आहे की, डेकवर ऐश्वर्या चेअर घेऊन बसलेली आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. बॅकग्राऊंडला चंद्रही दिसत आहे. त्यामुळे सुंदर अशा ऐश्वर्याच्या सौंदर्यात आणखीच भर पडली आहे आणि तिच्या या फोटोला त्या चंद्रामुळे चार चाँद लागले आहेत.

View this post on Instagram

✨🌈💕

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

अभिषेक आणि ऐश यांनी रावण, कुछ न कहो आणि गुरु यांसारख्या सिनेमात काम केलं आहे. मनिरत्नम हा त्यांचा शेवटचा सिनेमा आहे. या दोघांची रिअल लाईफ केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती.

View this post on Instagram

#durgapuja

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

 

You might also like