कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय झळकली सोनेरी रंगात ; मुलगी आराध्यानेही दिली साथ

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री ऐश्वर्या रायने ७२ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला आहे. रविवारी संध्याकाळी तिने रेड कार्पेट पर वॉक केलं आहे. माशाच्या आकाराच्या सोनेरी रंगातील ड्रेसमध्ये ऐश्वर्या खूपच उठून दिसत आहे. सोनेरी ड्रेस बरोबर सोनेरी रंगातील तिचा कान लक्षवेधक ठरला.

तब्बल १८ वेळेस ऐश्वर्या रायने कान्स रेड कार्पेटवर वॉक केलं आहे. २००२ पासून ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे. ऐश्वर्याने २०१९ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लुईस सबाजी कोचर यांचा फिश कट गाउन परिधान केला आहे. कानातील रिंग्सच्या जागी सोनेरी रंगातील कानाने लक्ष वेधून घेतले आहे.

ब्रॉन्ज मेकअपमुळे बोल्ड लूकमध्ये ऐश्वर्या दिसून आली. ऐश्वर्याने सोनेरी रंगाची नेल पॉलिश लावली होती. बेडकाच्या आकारातील रिंग आणि कानामध्ये सोनेरी रंगासोबत छोटे छोते डायमंड घातले होते. तिचा कानातील मेकअप हा आतापर्यंतच्या कान्स अपीरियंस पेक्षा हटके आहे.

मुलगी आराध्या देखील ऐश्वर्यासोबत दिसून आली. सात वर्षाच्या आराध्याने आईच्या सोनेरी पोशाखाला जुळेल असा पिवळ्या रंगातील ड्रेस परीधान केलेला पहायला मिळाला. दोघेही मायलेकी सोनेरीआणि पिवळ्या रंगात खूपच छान दिसत होत्या. त्या दोघींचे फोटो सोशल मिडीयटवर व्हायरल झाले आहेत.

कान्स फिल्म फेस्टिव्हल हा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल असून २००१ साली या फेस्टिव्हलची स्थापना झाली. फ्रान्समधील कान्स येथे हा फेस्टिव्हल होतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like