‘ऐश्वर्या-आराध्या’ला ‘कोरोना’ झाल्याचं कळताच विवेक ओबेरॉयनं केलं Tweet !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लोकांना कोरोनाच्या महामारीबद्दल जागरूक जागरूक करणारे बिग बी अमिताभ बच्चन आता कुटुंबासहित कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटीव आल्यानंतर अभिषेक बच्चननंही कोरोना टेस्ट केली आणि त्यालाही कोरोना झाल्याचं समोर आलं. यानंतर बच्चन कुटुबाच्या इतर सदस्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. यात ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन पॉझिटीव्ह निघाल्या. बच्चन कुटुबात फक्त जया बच्चनच कोरोना निगेटीव्ह आल्या.

यानंतर साऱ्यांनीच बच्चन कुटुंब लवकरात लवकर बरं होऊन कोरोनामुक्त व्हावं यासाठी प्रार्थना करत आहे. बच्चन कुटुंबियांसह ऐश्वर्या राय आणि आराध्याला कोरोनाची लागण झाल्याचं कळताच अभिनेता विवेक ओबेरॉय यानंही ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

विवेकनं ऐश्वर्या आणि आराध्या यांना कोरोना झाल्याची बातमी शेअर करत ट्विट केलं आहे की, “हे कुटुंब लवकरत लवकर कोरोनामुक्त व्हावं अशी आम्ही प्रार्थना करतो” असं विवेकनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एक वेळ अशी होती जेव्हा ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. म्हणूनच आता विवेकनं ट्वटि करताच साऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like