मोठी बातमी ! ऐश्वर्या राय बच्चन हॉस्पिटलमध्ये ‘अ‍ॅडमिट’, 5 दिवसापूर्वी झाला होता ‘कोरोना’

मुंबई : पोलीसामा ऑनलाइन – अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐश्वर्याला ताप आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐश्वयाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 5 दिवसांनी तिला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या शनिवारी रात्री महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी ट्विटरद्वारे आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली होती.

अमिताभ बच्चन यांना 12 जुलै रोजी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करून दिली होती तसेच मुलगा अभिषेक बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिषेकनेही त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करून दिली होती. आता त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे आज काही वेळापूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या रायला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची कोरोना टेस्ट 13 जुलै रोजी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर ती होम क्वारंटाईन होती. मात्र, आज ऐश्वर्याला ताप आल्यान खबरदारीचा उपाय म्हणून नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.