Aishwarya Rai Bachchan | ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी मालदीवमध्ये ‘या’ पध्दतीनं साजरा केला आराध्याचा 10 वा वाढदिवस

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  Aishwarya Rai Bachchan | ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची मुलगी आराध्याचा (Aradhya) १० वा वाढदिवस दोघांनी मालदीव मध्ये साजरा केला. अभिषेक ने त्याच्या इंस्टाग्राम वर आराध्याचा बर्थडे फोटो शेअर केला.आराध्याने तिच्या बर्थडे साठी पिच कलर ची फ्रॉक घातली होती. 10 वर्षांची आराध्या या फोटो मध्ये खुप गोंडस दिसते.अभिषेक ने आराध्याला शुभेच्छा देत लिहले. (Aishwarya Rai Bachchan)

 

“वाढदिवसाच्या शुभेच्छा राजकुमारी! जसे तुझी आई म्हणते ‘तू जगाला एक चांगले स्थान बनवतेस.’
आम्ही तुझ्यावर खुप प्रेम करतो आणि देवाचा आशीर्वाद नेहमी तुला लाभो.#aboutlastnight.”

 

अभिषेक प्रमाणे ऐश्वर्याने  देखील तिच्या लाडकीचा इंस्टाग्राम वर फोटो शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या.
ऐश्वर्या ने लिहले, “माझी परी आराध्याचा 10 वा वाढदिवस. तुझ्यामुळेच मी आज श्वास घेत आहे.
माझी प्रिय आराध्या तूच माझे जीवन आहेस… माझा आत्मा… मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करते”

 

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी 20 एप्रिल 2007 रोजी मुंबईत लग्न केले. या जोडप्याने 16 नोव्हेंबर 2011 रोजी त्यांच्या पहिल्या अपत्यास म्हणजेच आराध्यास जन्म दिला.
अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन गेल्या आठवड्यात आराध्यासोबत बीच डेस्टिनेशनला गेले होते.
ते त्यांच्या संबंधित इंस्टाग्राम अकाउंटवर मालदीवमधील सुंदर दृश्ये शेअर करत आहेत.

 

Web Title : Aishwarya Rai Bachchan | aishwarya rai bachchan gives glimpse aaradhya s 10th birthday celebration you are reason i breathe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली प्रकरणी मनपानं हायकोर्टात बाजू मांडली; पुढील सुनावणी 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी होणार – स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने

Vikram Gokhale | आगामी काळात विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही; ‘या’ मराठी निर्मात्याने केले जाहीर

Central Bank Of India Recruitment 2021 | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या