‘कोरोना’ पॉझिटीव्ह ‘ऐश्वर्या’ अन् ‘आराध्या’ अभिषेक बच्चन ‘जलसा’मध्ये परतले, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज !

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईच्या नानावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. अशात आता ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. दोघीही जलसामध्ये पोहोचल्या आहेत. 17 जुलै रोजी दोघींनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता 10 दिवसांच्या उपाचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.

ऐश्वर्या आणि आराध्या जलसामध्ये पोहोचल्यानंतर मुंबई महापालिकेनं तिथला कंटेंटमेंट झोनचा बोर्डही काढला आहे. बच्चन कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यानंतर जलसाला कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

 

12 जुलै रोजी ऐश्वर्या आणि आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. यानंतर श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर 17 जुलै रोजी त्यांना नानावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर आता दोघी जलसाला परत आल्या आहेत.

लोकांना कोरोनाच्या महामारीबद्दल जागरूक जागरूक करणारे बिग बी अमिताभ बच्चन आता कुटुंबासहित कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटीव आल्यानंतर अभिषेक बच्चननंही कोरोना टेस्ट केली आणि त्यालाही कोरोना झाल्याचं समोर आलं. सध्या त्यांच्यावर मुंबईतील नानावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.