‘भाईजान’ सलमानअगोदर ‘या’ मॉडेलला डेट करत होती ऐश्वर्या रॉय ! अभिनेत्री मनीषा कोईरालामुळं झालं होतं ‘ब्रेकअप’ ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्या लव स्टोरीबद्दल सर्वांनाच माहिती आहे. आणखी असं नाव आहे जे ऐश्वर्यासोबत जोडलं गेलं होतं. हे नाव आहे राजीव मूलचंदानी. हा तोच राजीव आहे ज्याचं नाव अभिनेत्री मनीषा कोईरालाच्या बॉयफ्रेडच्या यादीत समाविष्ट आहे. राजीवमुळेच बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींमध्ये मोठी कॅट फाईट झाली होती. 1999 साली दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्यानं यावर खुलून भाष्य केलं होतं आणि मनिषाला खरंखोटं ऐकवलं होतं.

कोण आहे राजीव मूलचंदानी ?
90 दशकातील टॉप मॉडेलपैकी एक नाव आहे राजीव मूलचंदानी. ऐश्वर्यादेखील याच काळात मॉडेलिंगमध्ये सक्रिय होती. तिनं राजीवसोबत काम केलं होतं. असं म्हटलं जातं की, दोघं खूप जवळ आले होते. परंतु ऐश्वर्याच्या मिस वर्ल्ड बनल्यानंतर आणि तिनं बॉलिवूडम्ध्ये एन्ट्री केल्यानंतर दोघे दूर होऊ लागले. ऐश्वर्यानं मात्र कायमच तो मित्र असल्याचं सांगितलं आहे.

https://youtu.be/kj7WuQKbXxM

काय म्हणाली होती मनीषा कोईराला
हा किस्सा 1994 मधील आहे जेव्हा मनीषानं सांगितलं होतं की, ती राजीवला डेट करत आहे आणि त्याच्यासोबत नात्यात आहे. त्यानं ऐश्वर्याला सोडलं आहे. 1991 मध्ये सौदागर सिनेमातून बॉलिवूड मध्ये डेब्यू करण्याआधी काही काळ मनीषानं मॉडेलिंग केली आहे.

ऐश्वर्यानं मुलाखतीत दिलं जोरदार प्रत्युत्तर
1999 साली दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्यानं सांगितलं होतं की, ती मनीषा आणि राजीवच्या लव स्टोरीचा हिस्सा नाही. दोन महिन्यांपूर्वी मनीषाचं ब्रेकअप झालं होतं आणि मनीषा कुणा दुसऱ्यासोबतच होती. मनीषानं प्रत्येक दुसऱ्या महिन्यात प्रियकर बदलला आहे.

ऐश्वर्यानं सांगितलं की, मिस वर्ल्ड झाल्यानंतर तमिळमध्ये बॉम्बे सिनेमा पाहिला होता. ऐश्वर्या तिला शुभेच्छा देणार होती परंतु तिला समजलं की, मनिषानं पुन्हा एकदा तिच्या बद्दल वक्तव्य केलं होतं. मनीषानं सांगितलं होतं की, तिनं ते लव लेटर्स पाहिले आहेत जे राजीवनं ऐश्वर्याला लिहिले होते.

ऐश्वर्या म्हणाली, “माझ्यासाठी हा एक झटका होता. जर तिचं ब्रेकअप माझ्या आणि राजीवमुळं झालं होतं तर ती एकदाच सारं काही का नाही सांगत आहे. का बरं ती 9 महिन्यांनंतर पुन्हा एक अँगल घेऊन आली. ब्रेकअपच्या 4 वर्षांनंतरही तिनं हा मुद्दा उचलून धरला आहे. याचं कारण तुटलेलं नांत नाही तर काही दुसरंच आहे. मनीषानं तिचे सीनीयर्स रेखा, श्रीदेवी यांसारख्याची कदर केली नाही. मग मी काय चीज आहे. तरीही मला वाटतं की, ती खुश रहावी आणि तिच्या आयुष्यात सेटल रहावी.