‘हम दिल दे चुके सनम’ सिक्वलमध्ये ऐश्वर्या – सलमान एकत्र ? 

मुंबई :वृत्तसंस्था – सन  १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला सलमान -ऐश्वर्याचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट अजूनही चाहत्यांसाठी ऑल टाइम फेव्हरेट चित्रपट आहे. याच चित्रपटाच्या सेटवर सलमान व ऐश्वर्याची लव्हस्टोरी बहरली होती. या चित्रपटानंतर एक-दोन चित्रपटात दोघांनीही एकत्र पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले. याचित्रपटानंतर दोघे कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाही.आता पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी या दोघांना एकत्र चित्रपटात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
काही दिवसापूर्वी संजय लीला भन्साळी  ‘हम  दिल दे चुके सनम’ चित्रपटाचा सिक्वल बनवणारअसल्याचे वृत्त होत.आणि या चित्रपटाच्या सिक्वल मध्ये सलमान खानची वर्णी लागली असल्याचेही वृत्त समोर आले होते.

या चित्रपटात सलमानच्या अपोझिट ऐश्वर्या राय हिला घेण्याची भन्साळींची इच्छा आहे. केवळ इतकेच नाही तर, लवकरच भन्साळी ही ऑफर  घेऊन ऐश्वर्याला भेटणार असल्याचेही कळतेय.

या आधीही संजय लीला भन्साळींनी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात ऐश्वर्या राय आणि सलमान खानला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ऐश्वर्याने ही ऑफर नाकारली होती.यानंतर सलमानही या प्रोजेक्टमधून बाहेर पडला. नंतर हा चित्रपट दीपिका आणि रणवीरच्या झोळीत पडला आणि सुपरहिट झाला.