मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऐश्वर्या आणि अभिषेक नुकतेच व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेले होते. त्यातील काही फोटो ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसोबत शेअर केले. चाहत्यांना हे फोटो खूपच आवडले आहेत. सध्या हे फोटो सोशलवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यातील अभिषेकने पोस्ट केलेला एक फोटो चाहत्यांना विशेष आवडल्याचे दिसत आहे.
अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला हा फोटो आराध्या आणि ऐश्वर्या यांचा आहे. दोघीही स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत. सध्या हा फोटो सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अभिषेकने या फोटोला खास कॅप्शनही दिले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिषेक म्हणतो, “Happiness, My girls…..”
शनिवारी (दि 20 एप्रिल रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाचा 12 वा वाढदिवस झाला. याच्याच सेलिब्रेशनसाठी अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या असे तिघे मिळून मालदीवला गेले होते.
यावेळी आराध्याने ऐश आणि अभिषेकचा एक स्पेशल फोटो काढला आहे. ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आराध्याने काढलेला त्यांचा स्पेशल क्लिक शेअर केला आहे. या फोटोला तिने एक छान असं कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये ऐश्वर्याने म्हटले आहे की, “आमची ही साथ आमच्या जीवनातील दिव्य प्रकाशाने कॅमेऱ्यात कैद केली आहे. लव्ह यू आराध्या.” असे तिने लिहिले आहे. या फोटोत ऐश्वर्या निळ्या रंगाचा ड्रेस घातला असून यात ती खूपट सुंदर दिसत आहे. अभिषेक अलगत ऐश्वर्याला बिलगल्याचे फोटोत दिसत आहे.
अभिषेकने ऐश्वर्याचा एक फोटो इन्स्टावर शेअर केला होता. त्यात ‘हनी अँड द मून’ असं कप्शन दिलं होतं. या फोटोत दिसत आहे की, डेकवर ऐश्वर्या चेअर घेऊन बसलेली आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. बॅकग्राऊंडला चंद्रही दिसत आहे. त्यामुळे सुंदर अशा ऐश्वर्याच्या सौंदर्यात आणखीच भर पडली आहे आणि तिच्या या फोटोला त्या चंद्रामुळे चार चाँद लागले आहेत.