ऐश्वर्या करणार ‘बाहुबली’मधील ‘या’ प्रसिद्ध कलाकारासोबत रोमान्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाहुबली या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या सिनेमाने अनेक विक्रम रचले होते. अभिनेता सत्यराज यांनी या सिनेमात कटप्पाची भूमिका साकारली होती. ही भूमिकाही प्रेक्षकांना विशेष भावली होती. दाक्षिणात्य सिनेमात सत्यराज यांचं खूप नाव आहे. आता सत्यराज बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्यासोबत काम करणार आहे. विशेष बाब अशी की, कटप्पा ऐश्वर्या सोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

पोन्निन सेल्वम या आगामी सिनेमात ऐश्वर्या आणि सत्यराज एकत्र दिसणार आहे. यात ऐश्वर्या मुख्य भूमिकेत असून तिच्या नवऱ्याची भूमिका सत्यराज साकारणार आहेत. ऐश्वर्या एका राजकुमारीच्या भूमिकेत झळकणार असल्याचं समजत आहे. एका तामिळ कादंबरीवर आधारीत या चित्रपटाची कथा असणार आहे. मणिरत्नम यांच्या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याच्या पतीच्या भूमिकेसाठी याआधी मोहनबाबू यांना विचारण्यात आलं होतं. परंतु काही कारणामुळे ते आता सिनेमात करणार नसल्याचे समजत आहे. त्यानंतर आता ही भूमिका सत्यराज साकारणार आहेत. अशीही माहिती समोर आली आहे की, या सिनेमातील एका भूमिकेसाठी मणिरत्नम यांनी अमिताभ बच्चन यांनासुद्धा विचारण्यात आलं आहे. परंतु त्यांनी अद्याप या भूमिकेसाठी आपला होकार कळवलेला नाही.

ऐश्वर्याने आआधी फन्ने खाँ हा सिनेमा केला होता. परंतु हा सिनेमा विशेष काही चालला नाही. त्यामुळे आता ऐश्वर्याची जादू दाक्षिणात्य सिनेमात चालणार का हे पाहणे मात्र उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसत आहे.