‘बिग बी’ अमिताभची नात आराध्या झाली 9 वर्षांची ! आई ऐश्वर्यानं फोटो शेअर करत दिल्या खास शुभेच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची नात आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) 9 वर्षांची झाली आहे. 16 नोव्हेंबर 2011 रोजी आराध्याचा जन्म झाला होता. तिची आई अ‍ॅक्ट्रेस ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिनं सोशलवर पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यात ऐश्वर्या आणि तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चनदेखील दिसत आहे.

ऐश्वर्यानं तिच्या इंस्टावरून आराध्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ऐश्वर्यानं लिहिलं की, 9 व्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझी प्रिय आराध्या. तुझं प्रेम सारं काही आहे. ईश्वराची तुझ्यावर कायम कृपा राहो. माझा प्रत्येक श्वास तुझ्यासाठी आहे.

ऐश्वर्याची ही पोस्ट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अवघ्या 3 तासांत ऐश्वर्याच्या या पोस्टला लाखो लाईक्स मिळाले आहेत. ऐश्वर्याच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्याच्या या पोस्टमध्ये भावुकता दिसत आहे. चाहत्यांना या तिघांचा फोटोही खूप आवडला आहे. सध्या ऐश्वर्याची ही पोस्ट सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

आराध्याचे आजोबा अमिताभ बच्चन यांनीही पोस्ट शेअर करत आराध्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या त्यांची ही पोस्ट सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.