Aishwarya Sharma-Neil Bhatt Wedding | लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Aishwarya Sharma-Neil Bhatt Wedding | बॉलीवूड आणि टीव्ही जगात सध्या लग्नाचा धुमाकूळ सुरू आहे. प्रत्येक स्टार आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधताना दिसत आहे. अशातच ‘गुम है किसी के प्यार में’ (Ghum Hai Kisi Ke Pyaar Mein) या मालिकेत विराट आणि पत्रलेखा म्हणजेच नील भट (Neil Bhatt) आणि ऐश्वर्या शर्माही (Aishwarya Sharma) लग्नबंधनात (Aishwarya Sharma-Neil Bhatt Wedding) अडकणार आहेत.

 

‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत नील आणि ऐश्वर्य शर्मा भावजय आणि वहिणीच्या भूमिकेत आहेत.
मात्र खऱ्या आयुष्यात दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत आहेत.
आता दोघेही नव्याने आयुष्याला सुरुवात करणार आहेत. दोघांचा विवाहच्या विधींना (Cultures) उज्जैनमध्ये सुरुवात झाली आहे.
त्यामुळे कुटुंबीयांची तारांबळ उडाली आहे. (Aishwarya Sharma-Neil Bhatt Wedding)

 

29 नोव्हेंबर रोजी नील आणि ऐश्वर्या शर्मा यांचा हळदी (Haldi) समारंभ पार पडला. या दरम्यान कुटुंबीय आणि मित्रांनी ऐश्वर्याला हळद लावली.
दोघांचे काही फोटो देखील समोर आले आहेत. ज्यामध्ये नील आणि ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर खूप हळद आणि आपल्या मित्रांसोबत कॅमेरा मध्ये पोज देताना दिसत आहेत.

 

निल आणि ऐश्वर्याचा म्हेंदी (Mhendi) सोहळा देखील पार पडला आहे.
त्यांचे फोटो समोर आले असून स्वतः ऐश्वर्याने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये नववधू तिची म्हेंदी दाखवताना दिसत आहे.
ऐश्वर्या शर्मा तिच्या कुटुंबासोबत म्हेंदी एन्जॉय करत असल्याचे चित्रात दिसत आहे.

एश्वर्याने तिच्या म्हेंदी समारंभा प्लाझो आणि सुंदर हिरव्या रंगाची कुर्ती परिधान केली आहे. यावर चंदेरी रंगाने मनगटावर काम केले आहेत.
या आऊटफिट मध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. याआधी ऐश्वर्या शर्माने नील भट सोबतचा स्वतःचा एक रोमँटिक व्हिडिओ देखील शेअर केला होता.
ज्यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ त्यांच्या प्री-वेडिंग (Pre Wedding Video) शूटचा आहे.
ज्यामध्ये बॅकग्राऊंड मध्ये बॉलीवूड गाणी वाजत आहेत आणि ऐश्वर्या आणि नील भट रोमँटिक सीन तयार करत आहेत.
या दरम्यान दोघेही एकत्र प्रचंड सुंदर दिसत आहेत. लवकरच दोघेही लग्न बंधणात (Aishwarya and Neil Wedding) अडकणार असून त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

 

Web Title : Aishwarya Sharma-Neil Bhatt Wedding | aishwarya sharma and neil bhatt wedding see mehndi and haldi ceremony pictures

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Supriya Sule | डान्स व्हिडीओवर टीका करणार्‍यांना सुप्रिया सुळेंचे उत्तर; म्हणाल्या…

Benefits Of Using Ice Cubes | चेहर्‍यावर बर्फ वापरण्याचे ‘हे’ आहेत 5 जबरदस्त फायदे, माहित नाहीत तर जाणून घ्या!

Travel Insurance | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत ! प्रवास करणे असेल आवश्यक तर काढा ट्रॅव्हल इन्श्युरन्स, जाणून घ्या कसा होईल फायदा