पाकिस्तानच्या चहा स्टॉलवर ‘अभिनंदन वर्धमान’ ; सोशलवर फोटो व्हायरल

इस्लामाबाद : वृत्तसंस्था –  भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानमध्ये घुसून वीरपराक्रम करून दाखवला. त्यांनी दाखवलेल्या शौर्याचे देशभरातून कौतुक करण्यात आले. अनेकजण त्यांचे चाहते झाले. तुम्हाला जर असं सांगितलं की, पाकिस्तानातही त्यांचे चाहते आहेत तर तुम्हाला खरे वाटेल का ? होय पण हे खरे आहे. कराचीतील चहावाल्याने आपल्या चहा कॅन्टीनवर अभिनंदन यांचा फोटो लावला आहे. होय हे खरे आहे. यावरून पाकिस्तानातही अभिनंदन यांचे चाहते आहेत हे स्पष्ट होते आहे.

पाकिस्तानच्या कराचीतील चहावल्याचा हा फोटो आणि त्यावर त्याने लिहिलेला मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. या चहावाल्याने अभिनंदन यांचा फोटो लावत त्यांवर खास उर्दू भाषेत संदेश लिहला आहे. त्यात अभिनंदन यांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. या चहावाल्याने आपल्या चहाच्या कॅन्टीनचे मार्केटींग केल्याचे दिसत आहे. ”एैसी चाय जो दुश्मन को भी, दोस्त बनाये” असा संदेश या चहावाल्याने आपल्या चहाच्या कँटीनवरील फलकात लिहिला आहे. त्यामुळे लोकांनी एकत्र येऊन आपापसातील वाद मिटवून चहाने तोंड गोड करावे असेच या चहावाल्याने सुचवले आहे.

पाकिस्तानमधील या अनोख्या चहा स्टाॅलचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही देशातील नागरिकांकडून हा फोटो ट्विटरवर व्हायरल करण्यात येत आहे. या फोटोचे कौतुक होतानाही दिसत आहे.

दरम्यान, 27 फेब्रुवारी रोजी विंग कमांडर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानी सैनिकांसमवेत चहा पिताना दिसून आले होते. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकला उत्तर देताना पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत घुसरण्याचा प्रयत्न केला होता. त्यास, भारताने प्रत्युत्तर देताना, विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग 21 हे विमान कोसळले होते त्यानंतर अभिनंदन हे पाकिस्तानच्या हद्दीत अडकले होते.

ह्याही बातम्या वाचा –

पुलवामात दहशतवाद्याकडून जवानाची हत्या

अखेर अमीरने सांगितले पुरस्कार सोहळ्याला न जाण्याचे कारण

सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय वायुसेनेकडून अलर्ट जारी

पवारांनंतर आता सुभाष देशमुख यांचाही माढ्यातून यु-टर्न

‘त्या’ मनुष्यबळाचा राजकीय प्रचारासाठी वापर करण्यास प्रतिबंध