दिवाळीपूर्वीच उरकून घ्या बँकांचे व्यवहार, 3 दिवस बँका संपावर जाणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळीआधी बँका संपावर जाण्याची शक्यता आहे. भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसने 10 बँकांच्या विलीनिकरणाच्या विरोधात 22 ऑक्टोबरला संपाचा इशारा दिला आहे. या संपात अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ आणि भारतीय बँक कर्मचारी परिसंघ यांचा समावेश असेल. संपामुळे दिवाळीआधी 3 दिवस बँका बंद राहू शकतात.

का देण्यात आला संपाचा इशारा
सरकारने 10 सरकारी बँकांचे विलीनिकरण करुन 4 मोठ्या बँका बनवण्याचा निर्णय घेतला आहे. बँक कर्मचाऱ्यांचा याला विरोध आहे. आयटक (AITUC) कडून बुधवारी सांगण्यात आले की आम्ही अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ आणि भारतीय बँक कर्मचारी परिसंघाबरोबर 22 ऑक्टोबरला संयुक्त पद्धतीने बोलावलेल्या देशव्यापी बँक संपात सहभागी होणार आहे. हा संप सरकारच्या 10 बँकांच्या सरकारी बँकांच्या विलीनिकरणाविरोधात आहे.

आयटकनुसार सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्रा बँक, इलाहाबाद बँक, यूनायडेट बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आता बंद होणार आहेत. या सर्व बँका उत्तम प्रदर्शन करत होत्या. सर्व बँकाचे योगदान देशाच्या आर्थिक विकासात उत्तम होते. या सांगण्यात आले की या सर्व बँकांचा आपला इतिहास आहे आणि कालावधीनुसार बँक मोठ्या होत आहेत.

यातून इशारा देण्यात आला की आधी भारतीय स्टेट बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलीनिकरण झाले परंतू त्याचा काही उपयोग झाला नाही, त्याचा सकारात्मक परिणाम झाला नाही. ही वेळ बँकांचे विलीनिकरण करण्याची नाही, तर आता बँकांच्या मदतीने अर्थव्यवस्थेत वाढ करण्याची आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी