लग्नामध्ये अडथळा आणल्यामुळे संतापला तरुण, JCB द्वारे उध्दवस्त केलं शेजारच्याचे दुकान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    केरळमधून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. एका तरूणाच्या लग्नामध्ये शेजारच्याने अडथळा आणल्यामुळे त्या तरुणाने त्याच्या शेजाऱ्याचे दुकान जेसीबीद्वारे उखडून टाकले आहे. पोलिसांच्या तपासात हे प्रकरण उघडकीस आले आहे. पहिले आरोपी म्हणत होता की, दुकानाचा वापर जुगार आणि दारूच्या धंद्यासाठी होत असल्यामुळे त्याने दुकान तोडले.

आरोपी युवकाला एका मुलीशी लग्न करण्याची इच्छा असल्याचे पोलिसांनी तपासणी दरम्यान सांगितले. मात्र शेजाऱ्याने त्याचे लग्न थांबवण्याचा प्रयत्न केला. लग्नाचा प्रस्ताव रखडल्यामुळे, तो तरुण इतका संतापला की त्याने बदला घेण्याचे ठरविले आणि जेसीबीला आणले आणि शेजाऱ्याचे दुकान पाडून टाकले. ही घटना सोमवारी कन्नूर जिल्ह्यातील चेरुपुझा भागात घडली.

30 वर्षांच्या या व्यक्तीने जेसीबी मशीनद्वारे शेजारचे दुकान उखडले. याप्रकरणी पोलिसांनी अल्बिन नावाच्या आरोपीला अटक केली. आरोपीने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओमध्ये त्याने दावा केला आहे की, दुकान अनेक बेकायदेशीर कामांसाठी वापरले जात होते.

अल्बिनने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, दुकान अवैध जुगार आणि मद्य व्यवसायासाठी वापरण्यात आले होते. यामुळे परिसरातील तरुण चिंतेत पडले होते. अल्बिनने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, पोलिस किंवा ग्रामीण अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दुकान काढून घेण्यासंदर्भात कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या कारणास्तव, त्याने दुकान पाडण्याचा विचार केला. दुकान पाडण्यापूर्वी आरोपी अल्बमिनने हा व्हिडिओ अपलोड केला. पोलिसांनी त्याच्यावर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.