Ajay-Atul | गाणी रिमिक्स करणाऱ्यांवर अजय – अतुलने व्यक्त केली नाराजी; म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या संगीताने सबंध महाराष्ट्राला वेड लावणारी जोडी म्हणजे अजय – अतुल (Ajay-Atul). या जोडीने मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत अनेक हिट गाणी दिली आहेत. सध्या त्यांनी संगितबध्द केलेल्या वेड या चित्रपटातील गाणी चाहत्यांना चांगलीच भुरळ घालत आहेत. पण त्यातच आता अजय – अतुल (Ajay-Atul) यांनी गाणी रिमिक्स करणाऱ्यांना एक विनंती केली आहे.

अजय – अतुल (Ajay-Atul) यांनी नुकतचं वेड या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी बोलताना गाणी रिमिक्स करणाऱ्यांना त्यांची गाणी रिमिक्स न करण्याची विनंती केली आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलियाचा ‘वेड’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या या सिनेमाचे संगित दिग्दर्शन अजय – अतुल (Ajay-Atul) या जोडीने केले आहे. सध्या या सिनेमाचे प्रमोशन जोरदार सुरू असून विविध ठिकाणी आयोजीत कार्यक्रमात या सिनेमाची टीम पोहचत आहे.

अशाच एका प्रमोशनल इवेंटमध्ये अजयला गाणी रिमिक्सबाबत प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर नाराजी व्यक्त करत अजय म्हणाला, ‘जेव्हा माऊलीचं डीजे व्हर्जन झालं होतं तेव्हा मला फार वाईट
वाटलं होतं. मी ते पूर्ण गाणं लिहीलं आहे आणि मला ते डीजे व्हर्जन आजिबात आवडलं नव्हतं.
ज्या गाण्यांची रिमिक्स होतात त्याची करा. कारण रिमिक्स हा एक वेगळा भाग आहे. लोकांना डान्स फ्लोअरवर वेगळी गाणी ऐकायला आवडतात, जे खरं तर ठीक आहे. सध्या दोन मार्ग आहेत, एक जण या रस्त्याने जातो आणि दुसरा त्या रस्त्याने. आम्ही यावर ओरिजनलचा मार्ग निवडला आहे. आम्ही ओरिजनलचं करावं असं वाटतं. पूर्वी १५ किंवा ३० वर्षांची गाणी रिमिक्स व्हायची. पण आता ३ ते ४ वर्षापूर्वीची बिचारी गाणी देखील रिमिक्स होत आहेत. आम्ही ओरिजनल मार्ग निवडलाय, त्यामुळे कृपया आमच्या गाण्यांचं रिमिक्स करू नका.’

दरम्यान, अजय – अतुल (Ajay-Atul) या जोडीचे संगीत असलेला रितेश – जेनेलियाचा ‘वेड’ हा सिनेमा ३० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title :-  Ajay-Atul | ajay atul song remix ajay gogavale get angry after listen dj songs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | किरकोळ कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, हडपसर परिसरातील घटना

Cholesterol वाढवण्यासाठी हे ५ फॅक्टर्स जबाबदार, करू नका दुर्लक्ष, अन्यथा होऊ शकतो जिवाला धोका!