कौतुकास्पद ! चहावाला मुलांची राहण्याची व्यवस्था करून देतोय NEET चे ‘धडे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओरिसातील अजय बहादुर सिंह सध्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट (NEET) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देव बनले आहेत. जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत. त्यांना हे मदत करण्याचे त्याचप्रमाणे शिकवण्याचे देखील काम करतात. त्यांना स्वतःला डॉक्‍टर  बनायचे होते.

मात्र वडिलांच्या निधनानंतर त्यांना शिक्षण अर्धवट सोडून घरखर्च चालवण्यासाठी काम करावे लागले. आणि यामुळे त्यांचे डॉक्‍टर होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. मात्र त्यांनी आपले स्वप्न जरी पूर्ण झाले नाही तरी ज्या विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा आहे मात्र त्यांच्याकडे पैसे नाहीत अशा गरीब विद्यार्थ्यांना ते आर्थिक आधार देतात. ते स्वतः चहा आणि सरबत विकून स्वतःचा उदरनिर्वाह करतात.

सध्या ते १४ विद्यार्थ्यांना नॅशनल  एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट म्हणजेच (NEET)  परीक्षेसाठी त्यांचा क्लास घेत आहेत. जीवनाच्या सुरुवातीला ते चहा आणि सरबत विकून आपला संसार चालवत होते. मात्र हळूहळू परिस्थिती सुधारायला लागल्यानंतर त्यांनी आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या मुलांसाठी एक क्लास उघडला. त्यांनी या मुलांना आपल्या क्लासमध्ये निशुल्क शिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी जिंदगी फाउंडेशनची स्थापना केली. यामध्ये या मुलांना  मोफत शिक्षण, भोजन आणि राहण्याची  सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डॉक्टर देखील घेतात मोफत क्लास
आनंद कुमार यांच्या सुपर ३० यांच्या पासून प्रेरित होत बाडमेरमधील डॉ भारत सरन यांनी २०१२ मध्ये ५० ग्रामीण सेवा संस्थानाची स्थापना केली. या क्लासमध्ये ते आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या मुलांना शिक्षण देतात. एका मुलामागे  वर्षाला २५ हजार रुपये खर्च येतो असे त्यांनी सांगितले.