अजय देवगण, ‘खिलाडी’ अक्षय आणि दीपिका पादुकोणचा सिनेमा 2021 मध्ये बॉक्स ऑफिसवर देणार एकमेकांना ‘टक्कर’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड इंडस्ट्रीत सिनेमाची रिलीज डेट खूप महत्त्वाची असते. कारण अनेकदा असं होतं की, एकाच वेळी दोन सिनेमेही थिएटरमध्ये रिलीज होत असतात. याचा बॉक्स ऑफिसवरील कमाईवर परिणाम होतो. या वर्षाच्या सुरुवातीलाच याद उदाहरण समोर आलं होतं. 10 जानेवारी 2020 रोजी दोन सिनेमे रिलीज झाले. एक म्हणजे अजय देवगणचा तान्हाजी द अनसंय वॉरियर आणि दीपिका पादुकोणचा छपाक. तान्हाजी सिनेमा आजही थिएटरमध्ये सुरू आहे. छपाक खास काही चालला नाही.

अजय देवगणच्या तान्हाजी सिनेमानं अनेक सिनेमांना जबरदस्त टक्कर दिली. यात छपाक, स्ट्रीट डान्सर थ्री डी, पंगा, भूत, शुभ मंगल ज्यादा सावधान यांसारखे अनेक सिनेमे आहेत. आता अशी माहिती आहे की येणाऱ्या 2021 मध्ये 14 फेब्रुवारी म्हणजेच वॅलेंटाईन डेच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 3 सिनेमे रिलीज होणार आहेत.

यात अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा अतरंगी रे, दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे यांचा सिनेमा आहे ज्यांची आधीच घोषणा झाली आहे.

यानंतर आता अलीकडेच अजय देवगणनं ट्विट करत सांगितलं आहे की, त्याचा तमिल रिमेक कैथी हा सिनेमा देखील 14 फेब्रुवारी 2021 रोजी रिलीज होणार आहे. आता हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की, कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like