अजय देवगणच्या ‘मैदान’ चा फर्स्ट लुक रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अजय देवगणचा तान्हाजी : द अनसंग वॉरियर हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी रिलीज झाला होता. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत 200 कोटींचा टप्पा पार केला. सिनेमाच्या एवढ्या सक्सेसनंतर अजय देवगण लगेचच आगामी प्रोजेक्टमध्ये बिजी झाला. अजयच्या आगामी सिनेमाचं नाव आहे मैदान. भारतीय फुटबॉल टीमचे कोच सईद अब्दुल रहिम यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. या बायोपिकवर सध्या काम सुरू आहे.

अजयच्या मैदान या आगामी सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आला आहे. अजयनं स्वत: सोशलवर सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. पोस्ट शेअर करताना अजयनं सिनेमाची रिलीज डेटही सांगितली आहे. अजय म्हणतो, “मैदान साठी तयार व्हा. 27 नोव्हेंबर 2020.”

मैदान हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. ज्यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारीत आहे ते सईद अब्दुल रहिम 1950 ते 1963 पर्यंत फुटबॉल टीमचे कोच होते. अजय देवगण रहिम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना मॉडर्न इंडियन फुटबॉलचा आर्कीटेक्टही म्हटलं जातं. बधाई हो हा सिनेमा डायरेक्ट करणारे अमित शर्मा हा सिनेमा बनवत आहेत. त्यांचा हा बॉलिवूडमधील दुसरा सिनेमा आहे.

या सिनेमात अजय देवगणसोबत कीर्ती सुरेशला कास्ट करण्यात आलं होतं. चाहत्यांना अजयच्या पेयरींगपेक्षाही कीर्तीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल जास्त उत्सुकता होती. परंत डेट्स न मिळाल्यानं हे काही शक्य झालं नाही.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like