‘हा’ अभिनेता बनवणार गलवान खोऱ्यातील शहिद जवानांच्या पराक्रमावर आधारीत सिनेमा !

पोलीसनामा ऑनलाइन – अशी माहिती समोर आली आहे की, बॉलिवूड स्टार अजय देवगण गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या 20 सैनिकांच्या शौर्यावर आधारीत सिनेमा बनवणार आहे. फिल्म क्रिटीक तरण आदर्श यानं यासंदर्भात माहिती दिली आहे. सोशलवर त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे.

तरण आदर्शनं ट्विट केलंय की, “अजय देवगण गलवाल खाोऱ्यात झालेल्या चकमकीवर आधारीत सिनेमा तयार करणार आहे. सिनेमाच्या टायटलवर अजून विचार झालेला नाही. सिनेमात त्या 20 जवानांची कहाणी दाखवली जाणार आहे ज्यांनी मोठ्या धैर्यानं चीनी आर्मीसोबत दोन हात केले. सिनेमाच्या कास्टींगबद्दल बोलायचं झालं तर यावरही अद्याप काही विचार झालेला नाही.”

अजय देवगणला असे सिनेमे बनवण्याचा छंद

अजयच्या या सिनेमाच्या घोषणेत चकित करणारं असं काहीच नाही. कारण सत्य घटनेवर आधारीत असे अनेक सिनेमे आजवर त्यानं बनवले आहेत ज्यातून राष्ट्रभक्तीही जागृत होताना दिसते. त्याचा तान्हाजी हा सिनेमाही त्यापैकीच एक होता. त्यामुळं अजय कायमच असे सिनेमे बनवत असतो.

अजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो मैदान सिनेमात दिसणार आहे. यात त्यानं भारतीय फुटबॉल टीमचे कोच राहिलेले सैय्यद अब्दुल रहीम यांचा रोल साकारला आहे. याशिवाय तो भुज : द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमातही दिसणार आहे. अभिषेक दुधैयानं याचं डायरेक्शन केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like