अजय देवगणनं केली Immunity Booster ची जाहिरात, ट्रोलर्स म्हणाले – ‘तुझं ऐकून आम्ही पानमसाला खातोय’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार अजय देवगण सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी अनेक पर्याय सांगत आहे. अलीकडेच त्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या एका औषधाची जाहिरात केली. परंतु यामुळं अजय प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे. तुझं ऐकूनच आम्ही विमल खायला सुरुवात केली असं म्हणत अनेकांनी अजयची खिल्ली उडवली आहे.

अजयनं एका औषधाचा फोटो ट्विट करत लिहिलं होतं की, “हेलो मित्रांनो, गेल्या महिन्याभरापासून मी IMMU 10T हे औषध घेत आहे. हे एक प्रकारचे इम्युनिटी बूस्टर आहे. या औषधानं माझ्यावर चांगला परिणाम झाला आहे. तुम्ही हे औषध अ‍ॅमेझॉन इंडियावरून खरेदी करू शकता.”

अजयच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. अनेकांनी खिल्ली उडवत यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या अनेक मजेदार ट्विट समोर येताना दिसत आहेत. एकानं असंही म्हटलं की, आम्हाला वाटलं विमल हे तुझं इम्युनिटी बुस्टर आहे. एकानं कमेंट केली तुझं ऐकून आम्ही विमल पानमसाला खातोय.

https://twitter.com/RadioGu25870316/status/1280504274171068417?s=20

अजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो मैदान सिनेमात दिसणार आहे. यात त्यानं भारतीय फुटबॉल टीमचे कोच राहिलेले सैय्यद अब्दुल रहीम यांचा रोल साकारला आहे. याशिवाय तो भुज : द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमातही दिसणार आहे. अभिषेक दुधैयानं याचं डायरेक्शन केलं आहे.