अजय देवगनची लेक थिरकली ‘बोले चुडिया’ गाण्यावर; नास्याचे ठुमके पाहून चाहते पडले प्रेमात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडची लोकप्रिय जोडी काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा सध्या सिंगापूरमध्ये तिचं शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. सध्या नास्याचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. शाळेतील एका कार्यक्रमात न्याया आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आईच्या सुपरहिट ठरलेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमातील ‘बोले चुडिया’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स करत असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळतय.

नास्याच्य़ा एका फॅन पेजने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आई म्हणजेच काजोलच्या याच हिट गाण्यावर तिच्या लेकीने ठेका धरत धमाल केल्याचं या विडिओ मध्ये पाहायला मिळत आहे.