अजय देवगनची मुलगी न्यासाच्या सतत ‘ट्रोल’ होण्यावर अजय म्हणतो…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल इंडस्ट्रीतील सर्वात पॉप्युलर आणि सक्सेसफुल अॅक्टर्सपैकी एक आहे ज्यांनी आपल्या कामाच्या कमिटमेंट्ससोबत कधीच कसली तडजोड केली नाही. त्यांनी हा प्रयत्न देखील केला आहे की, या गोष्टीचा त्यांच्या मुलांच्या आयुष्यावर काही परिणाम नाही झाला पाहिजे.

बॉलिवूडमधील अनेक पालकांप्रमाणे या अजय आणि काजोलही आपल्या मुलांना स्पॉटलाईटपासून दूर ठेवत त्यांना नॉर्मल लाईफ देण्याचा प्रयत्न करत असतात. आता मुलं थोडी मोठीही झाली आहेत आणि इंटरनेटवर लोक त्यांना ट्रोलही करत असतात. त्यांच्या ट्रोल होण्यावर अजयने भाष्य केलं आहे. याबाबतीत अजय म्हणतो की, “जे लोक असं काम करतात त्यांचा माईंडसेटच घाणेरडा असतो. त्यामुळे अशा गोष्टींमुळे वैताग करून घेणेच मी सोडले आहे. इतकेच काय मी अशा गोष्टींकडे ध्यानच देत नाही. ही लोक नेहमीच आपला फेक आयडी वापरून असे उद्योग करत असतात.”

असे वाटत आहे की, आताच न्यासा आणि युग यांनी आपल्या करिअरबद्दल ठरवले आहे. जेव्हा अजयला याबाबत विचारण्यात आलं की, मुलांच्या बॉलिवूड एंट्रीबद्दल त्याचं काय म्हणणं आहे तेव्हा अजय म्हणाला की, “माझ्या मुलीचा कल अॅक्टींगकडे अजिबात नाहीये. मुलाबाबत बोलायचे झाले तर त्याच्याबाबतीत हे सगळं डिसाईड करायला तो अजून खूप लहान आहे. माझ्या मते मुलांना खूपच एक्सपोजर मिळत असतं. त्यांच्याकडे इंटरनेटसोबतच टेलिव्हिजनचीही सुविधा आहे ज्याच्यामुळे ते खूप काही शिकतात. आमच्या काळाच असला कोणत्याही प्रकारचा प्लॅटफॉर्म नव्हता. मला जेव्हा कधी फोनला घेऊन काही अडचण येते मी लगेच तो फोन युगला द्यायचो कोणतेही कष्ट न घेता तो त्याला नॉर्मल करत असतो.”

तु्म्हाला सांगू इच्छितो की, जेव्हा अजयच्या वडिलांचे म्हणजेच न्यासाच्या आजोबांचे निधन झाले होते तेव्हा न्यासा ट्रोल झाली होती. त्यांच्या निधनानंतर लगेच न्यासाचा पार्लरवाला फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. याआधीही आपल्या एअरपोर्ट लुकमुळेही न्यासा इंटरनेटवर ट्रोल झाली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय