SS राजामौलींचा सिनेमा RRR साठी अजय देवगणनं ‘फीस’ नाकारली, ‘या’ दिवशी होणार रिलीज

मुबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लवकरच एस.एस. राजामौली यांच्या ‘RRR’चित्रपटात काम करताना दिसणार आहे. अजय या चित्रपटात काम करण्यासाठी कोणतेच मानधन घेणार नाही. चित्रपटाचे प्रोड्यूसर डीवीवी धन्या यांनी अजयला फीची ऑफर केली आहे. तरी देखील त्याने फी घेण्यासाठी नकार दिला आहे. अजय आणि राजामौली हे खूप चांगले मित्र आहे.

अजय आणि राजामौलीची मैत्री तेव्हापासून आहे जेव्हापासून त्यांनी ‘ईगा’वर काम केले होते. ‘ईगा’ या चित्रपटात अजयने हिंदीमध्ये एक छोटा व्हॉईसओव्हर केला होता. नंतर 2012 मध्ये ‘ईगा’चा हिंदी रिमेकदेखील रिलीज झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अजयला दिले जाणारे शुल्क एनटीआर आणि राम चरण यांच्या फीच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा अजयने फी घेण्यास नकार दिला, तेव्हा निर्मात्यांनी त्याला प्रत्यक्ष फी दिली, अजयने ती फीसुद्धा घेतली नाही.

या चित्रपटामध्ये केवळ मैत्रीसाठी काम करत असल्याचे अजय याने स्पष्टपणे सांगितले आहे. चित्रपटात राम चरण आणि एनटीआर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. RRR च्या निर्मात्यांनी देखील रिलीझची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या सोशल मीडियावर घोषणा करत आरआरआर टीमने लिहिले की, ‘हा चित्रपट 8 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आम्हाला माहित आहे की प्रतीक्षेचा काळ खूप जास्त आहे पण तोपर्यंत आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू.’

आरआरआर एकाच वेळी दहा भाषांमध्ये जगभरात प्रसिद्ध होणार आहे. अजय देवगण व्यतिरिक्त आलिया भट्टही या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात रे स्टिव्हनसन, अ‍ॅलिसन डूडी आणि ऑलिव्हिया मॉरिस या आंतरराष्ट्रीय कलाकारांचीही भूमिका असणार आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर आधारित असून सत्य घटनेवर आधारित आहे. राजामौलीचा हा पहिला चित्रपट आहे.