Wedding Anniversary Specail : पहिल्या नजरेत ‘तो’ खटकला, ‘असा’ आहे ‘काजोल-अजय’चा प्रेमापासून लग्नापर्यंतचा प्रवास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार काजोल आणि अजय देवगण यांच्या लग्नचा आज 21 वा वाढदिवस आहे. दोघांच्या लव स्टोरीनं त्या काळात खूपच अटेंशन घेतलं होतं. आज आपण त्यांच्या लव स्टोरी आणि लग्नापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.

https://www.instagram.com/p/B7YAi86hhME/

‘अशी’ झाली होती काजोल-अजयची भेट

काजोलनं अजयला हलचल सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा पाहिलं होतं. काजोलनं विचारलं होतं की सिनेमाचा हिरो कोण आहे तेव्हा कोणीतरी अजयकडे इशारा केला होता. अजय खूपच विचित्र अंदाजात बसला होता. काजोलला त्याचा हा अंदाज अजिबात आवडला नव्हता.

https://www.instagram.com/p/B5sD1qghueY/

काजोलला नव्हता आवडला अजय

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, पहिल्या भेटीनंतर काजोल अजयला अजिबात पसंत करत नव्हती. हेच कारण आहे की, काजोल सेटवर त्याच्याबद्दल वाईट साईट बोलायची.

अशी झाली प्रेमाला सुरुवात

हलचल सिनेमाच्या सेटवरच दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती. शुटींगदरम्यान दोघं एकमेकांच्या खूप क्लोज आले होते. चार वर्ष एकमेकांना डेट केलं होतं. अनेक सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं होतं. 1998 साली प्यार तो होना ही था सिनेमाच्या सेटवर दोघांना प्रेमाची जाणीव झाली. त्यांना जाणवलं की, ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. खास बात अशी की, अजयनं काजोलला थेट प्रपोज कधीच केलं नाही. परंतु त्यांना एकमेकांच्या मनातील गोष्ट माहिती होती. दरम्यान अजयनं करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांनाही डेट केलं आहे. त्याच्या आयुष्यात येणारी काजोल ही पहिली मुलगी होती असं अजिबात नाही.

1999 मध्ये केलं लग्न

अजय आणि काजोलनं 1999 साली लग्न केलं. त्यावेळी प्रत्येकजण दोघांच्या या निर्णयानं चकित झाले होते. त्या काळात काजोल एक मोठी स्टार होती आणि अजय बॉलिवूडमध्ये राहण्यासाठी स्ट्रगल करत होता. अजय आणि काजोल यांना दोन मुलं आहेत. युग आणि न्यासा अशी त्यांची नावे आहेत.