अजय-काजोलनं विकत घेतला नवीन बंगला, जाणून घ्या किंमत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीमुळे देशात अनेकांना नोकरी गमवावी लागली. अनेकांचे रोजगार बुडाले, आयुष्य रस्त्यावर आले. मात्र, बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी हे अपवाद आहेत. अनेक बडे सेलिब्रिटी मुंबईत अलिशान प्रॉपर्टी खरेदी करत आहेत. आलिया भट, हृतिक रोशन, जान्हवी कपूर यांच्यानंतर नुकताच अर्जुन कपूरने एक अलिशान स्कायव्हिला खरेदी केला. पाठोपाठ अमिताभ बच्चन यांनी कोट्यवधी रूपयांचे डुप्लेक्स खरेदी केले. आता अजय देवगण (ajay devgn and kajol)यानेही मुंबईच्या जुहू भागात नवा शानदार बंगला खरेदी केला आहे.

World Kidney Day : ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, किडनी फेल होण्याचे असू शकतात संकेत, जाणून घ्या

अजय व काजोल गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये नव्या घराचा शोध घेत होते. यादरम्यान एका मित्राने त्यांना या बंगल्याबद्दल सुचवले. अजय व काजोलने हा बंगला पाहिला आणि पाहताक्षणीच तो त्यांना पसंत पडला. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच या बंगल्याचे खरेदी प्रक्रिया सुरू झाली होती. या महिन्याच्या सुरुवातीला अजय देवगण आणि त्याची आई वीणा विरेंद्र देवगण यांच्या नावावर हा बंगला ट्रान्सफर करण्यात आला. अजय देवगणने बंगल्याचे नुतनीकरण सुरू आहे. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, बंगल्यात काही बदल केले जाणार असल्याचे कळतेय. लवकरच अजय या बंगल्यात राहायला येणार असल्याचेही मानले जात आहे.

पोटाचा घेर कमी करायचाय ? आहारात करा घोसाळ्याचं सेवन ! जाणून घ्या इतर फायदे

अजयने खरेदी केलेल्या या बंगल्याची किंमत ६० कोटी रूपये असल्याचे कळतेय. ५ हजार ५९० चौरस फुटांमध्ये विस्तारलेल्या या बंगल्यात पार्किंगसाठी खास व्यवस्था आहे. सुंदर गार्डन आणि एक लहानसा स्वीमिंग पूलही आहे. अजयने गेल्यावर्षीच हा बंगला खरेदी केला होता. पण ताबा मिळायला वर्ष लागलं.
अजयने खरेदी केलेल्या या बंगल्याचे नाव ‘शक्ती’ आहे. या बंगल्याची मूळ किंमत ६५ ते ७० कोटी होती. मात्र कोरोना महामारीमुळे रिअल इस्टेस्ट मार्केटमध्ये मंदी आहे. याचा लाभ घेत अजयने घाईघाईत हा बंगला खरेदी केला. यासाठी त्याने ६० कोटी रूपये मोजलेत.

अजयचे मैदान, भूज- द प्राईड ऑफ इंडिया, थँक गॉड ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

राज्याचे मिशन ऑक्सिजन स्वावलंब धोरण ! पुणे विभागात होणार प्रतिदिन 200 टन ऑक्सिजन निर्मिती, 16 नवीन प्रकल्पांचा प्रस्ताव

Pune : पुणे शहरात 8 दिवसांत तरुणवर्गातील 74 हजार 691 जणांचे लसीकरण

Indian Idol 12 : सुनिधी चौहाननं सांगितली ‘इंडियन आयडल’ची ‘रिॲलिटी’; म्हणाली – ‘मला स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगितलं होतं’