home page top 1

‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’चं पोस्टर रिलीज, मालुसरेंचा पराक्रम रूपेरी पडद्यावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या ऐतिहासिक चित्रपटांचा बोलबाला आहे. तानाजी मालुसरे या शूर मावळ्याचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर रिलीज झाले आहे. 10 जानेवारी 2020 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेता अजय देवगण या चित्रपटात तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.तर अभिनेता सैफ अली खान उदयभान राठोड यांची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी सैफ अली खान या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. सिंहगड किल्ल्यावरील तानाजी मालुसरे आणि उदय भान यांच्यातील लढाईवर आधारित हा चित्रपट आहे. अजय देवगनबरोबरच काजोल, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी, शरद केळकर, जगपती बाब, नेहा शर्मा या कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

‘बुद्धी… जी तलवारीप्रमाणेच धारदार होती….. ‘, असं कॅप्शन देत अजयने चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेयर आहे. या कॅप्शनमध्ये त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे.

 

Visit  :Policenama.com

Loading...
You might also like