Ajay Devgn | बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्याने केवळ बॉलीवूडच नाही तर भोजपुरी सिनेसृष्टीत उमटवला ठसा

0
522
Ajay Devgn | bhojpuri cinema ajay devgn bhojpuri film with manoj tiwari dharti kahe pukar ke
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आज देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. अजयचा नुकताच ‘दृश्यम 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दृश्यमचा दृश्यम 2 हा सिक्वेन्स प्रेक्षकांना देखील फारच आवडला होता. अनेकांनी या चित्रपटातील अजयच्या (Ajay Devgn) भूमिकेचे भरभरून कौतुक केले होते. तर आता अजय देवगणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे अजयने बॉलीवूड मध्येच नाही तर भोजपुरी इंडस्ट्री मध्ये देखील आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत.

अजय देवगणने मनोज तिवारी आणि शर्बानी मुखर्जी यांच्यासोबत ‘धरती कहे पुकार के’ या भोजपुरी चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात अजय देवगणने पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. बॉलिवूड प्रमाणे या चित्रपटात देखील अजय देवगणने त्याच्या सिंघम स्टाईल मध्ये सर्वांनाच भुरळ पाडले होते. त्याच्या सिंघम स्टाईलला भोजपुरी टच प्रेक्षकांना फारच आवडले होते. हा चित्रपट 2006 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

या चित्रपटात अजयला (Ajay Devgn) एसीपी कुणाल सिंह या पात्रात पाहून चाहते खूपच थक्क झाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन असलाम शेख यांनी केले होते. तर आजही या चित्रपटातील गाणे युट्युब वर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. अजयला भोजपुरी चित्रपटात पाहून प्रेक्षक फारच आनंदी झाले होते.

 

Web Title :- Ajay Devgn | bhojpuri cinema ajay devgn bhojpuri film with manoj tiwari dharti kahe pukar ke

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bachchu Kadu | ‘शिंदे गटाच्या उठावामुळे राज्यात राजकीय अस्थिरता;’ आमदार बच्चू कडूंचा शिंदे गटाला घरचा आहेर

Pune Crime News | जेवण न देता दारु पिलेल्या दुसर्‍या पत्नीचा लाथाबुक्क्यांनी केला खून; रिक्षाचालकाला अटक

Mumbai Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू