‘कैथी’च्या हिंदी रिमेकमध्ये लिड रोल करणार अजय देवगण, ‘या’ दिवशी होणार रिलीज

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडमध्ये रिमेक सिनेमांचा सिलसिला सुरूच असल्याचं दिसत आहे. अशात आता अभिनेता अजय देवगणच्या एका रिमेक सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. अजय देवगणनं याबाबत ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्य अजय देवगण म्हणतो, “होय, मी तमिळ सिनेमा कैथीचा हिंदी रिमेक बनण्यावर काम करत आहे. 12 फेब्रुवारी 2021 रोजी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.” आपल्या या ट्विटमध्ये अजयनं मीना अय्यर आणि रिलायन्स एंटरटेंमेंटला टॅग केल्याचंही दिसत आहे.

या सिनेमाच्या रिमेकची घोषणा या महिन्याच्या सुरुवातीलाच करण्यात आली होती. परंतु कास्टींगबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. या सिनेमात सलमान खान पासून तर हृतिक रोशनपर्यंत लिड रोल करण्याबद्दल अंदाज लावले जात होते. अशात अजयनं या गोष्टीवरून पडदा उचलला आहे.

रिलायन्स एंटरटेंमेंट ग्रुपचे सीएईओ शिबाशीष सरकार यांनी सांगितलं होतं की, कैथी एक कमाल सिनेमा आहे. ज्यांना कॉम आणि क्रिमिनल पहायला आवडतात अशा सर्वांसाठी हा सिनेमा आहे. कधीच पाहिला नसेल असा हा सिनेमा आहे.”

काय आहे स्टोरी ?
नुकताच तुरुंगातून सुटलेला आरोपी आपल्या मुलीला पहिल्यांदा भेटू इच्छित आहे. परंतु तो पोलीस आणि ड्रग माफियांच्या लढाईत अडकतो. अशी स्टोरी असणारा हा सिनेमा सिनेमाची स्टोरी दिल्लीच्या अवतीभोवती फिरते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like