मुलगी ‘न्यासा’ला ‘कोरोना’ची लागण झाल्याच्या बातमीवर अजय देवगणनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन :देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. बाधितांची संख्या रोज वाढताना दिसत आहे. कोरोनामुळं आतापर्यंत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशात अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची मुलगी न्यासाबद्दल एक बातमी समोर येताना दिसली. असं म्हटलं जात होतं की, न्यासाला आणि काजोलला कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यावर आता खुद्द अजय देवगणनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं या प्रकरणी सत्य सांगितलं आहे.

अजय देवगणनं या संदर्भात ट्विट केलं आहे. या सगळ्या अफवा चुकीच्या आहेत असं सांगत अजय म्हणतो, “विचारण्यासाठी धन्यावाद. काजोल आणि न्यासा एकदम ठिक आहेत. त्यांच्या आरोग्याबद्दल समोर आलेल्या अफवा खोट्या, मुर्खतेच्या आणि आधारहीन आहेत.” यानंतर आता काजोल आणि न्यासाला कोरोना झाल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

अलीकडेच काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची मुलगी न्यासा हॉस्पिटलमध्ये स्पॉट झाली होती. न्याास आणि काजोल मध्यरात्री हॉस्पिटलला जाताना दिसल्यानंतर काजोल आणि अजयच्या अनेक चाहत्यांना चिंता वाटू लागली. न्यासा आणि काजोल यांनाही कोरोनाची लागण झाली नसेल ना अशी भीती त्यांना वाटू लागली होती. यानंतर अनेक उलट सुलट चर्चा होताना दिसल्या.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like