home page top 1

तनुश्री दत्ताच्या ‘त्या’ आरोपांवर अजय देवगण म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अजय देवगणचा आगामी सिनेमा ‘दे दे प्यार दे’ मध्ये अलोकनाथ यांना भूमिका दिल्याने अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अजय देवगणवर टीका केली होती. अलोकनाथ यांच्यावर निर्माती विनिता नंदा यांनी मीटू या मोहिमेअंतर्गत लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. अशा माणसाला सिनेमात घेण्यानर तनुश्रीने अजयवर निशाणा साधला होता. यावर आता अजय देवगण याने स्पष्टीकरण दिले आहे.

अजय देवगण म्हणाला की, मीटून मोहिम सुरु झाली, तेव्हा मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. मी महिलांचा प्रचंड आदर करतो. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना आमचा विरोध आहे आणि यापुढेही असेलच. आजही या मुद्द्यावर माझी भूमिका तीच आहे जी आधी होती. अलोकनाथ यांची भूमिका बदलणं किंवा त्यांच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला घेऊन पुन्हा शुटींग करणं खूप जास्त खर्चिक झालं असतं.” असे अजयने स्पष्ट केले.

पुढे बोलताना अजय म्हणाला की, “दे दे प्यार दे चित्रपटाची शुटींग सप्टेंबर 2018 मध्ये संपली आणि अलोकनाथांचे चित्रपटातील त्यांच्या भागांचं काम ऑगस्टमध्ये मनालीत पूर्ण झालं. जवळपास 10 अभिनेत्यांच्या टीमसह सलग 40 दिवस सुटींग सुरु होती. जेव्हा ऑक्टोबर 2018 मध्ये मीटू मोहिमेला सुरुवात झाली आणि अलोकनाथ यांच्यावर आरोप झाले तोपर्यंत आम्ही दुसऱ्या चित्रपटांमध्ये काम करु लागलो होतो. पुन्हा तारखा जुळवून 40 दिवस संपूर्ण टीमसह बाहेर शुटींग करणं अशक्य होतं. त्याचप्रमाणे हे जास्त खर्चिकही होतं. चित्रपटाचं बजेट दुप्पट झालं असतं. त्या खर्चाबाबत निर्णय घेण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य निर्मात्यांना आहे.”असे अजय म्हणाला.

दरम्यान अजयवर टीका करताना तनुश्री म्हणाली होती की, “सिनेसृष्टी ही खोटी आणि दिखाऊ करणाऱ्या ढोंगी लोकांनी भरलेली आहे. अलोकनाथ यांच्यावर गंभीर आरोप आहेत. अलोकनाथ असलेले चित्रपटातील दृश्ये पुन्हा चित्रीत केली जाऊ शकतात. परंतु तरीही त्यांनी असे केले नाही.”

Loading...
You might also like