8 महिन्यांच्या आरामानंतर मैदानात उतरला अजय देवगण ! ‘भुज’मध्ये सोनाक्षी सिन्हा अन् संजय दत्त साकारणार महत्त्वाची भूमिका

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) यानं जवळपास 8 महिने आराम केल्यानंतर मंगळवारपासून सेटवर जात कामाला सुरुवात केली आहे. त्यानं त्याचा अधुरा सिनेमा भुज : द प्राईड ऑफ इंडिया (Bhuj: The Pride of India) ची शूटिंग हैदराबादमध्ये सुरू केली आहे. त्यानं सिनेमाची जास्तीत जास्त शुटिंग ही लॉकडाउनच्या आधीच केली होती. आता फक्त 10 ते 12 दिवसांचं काम बाकी आहे जे अजय लवकरच पूर्ण करेल.

भुज : द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमाबद्दल बोालयचं झालं तर सिनेमात अजय स्क्वाॅड्रन लीडर विजय कर्णिक (Vijay Karnik) यांची भूमिका साकारणार आहे. 1971 साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट असणार आहे. हवाई दलाच्या युद्धातील योगदानावर हा चित्रपट आहे. भुज द प्राईड ऑफ इंडिया या चित्रपटात कर्णिक हे भारत-पाक युद्धादरम्यान हवाई दलाच्या भुज तळावर नियुक्त होते.

भारत पाकच्या या युद्धात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात भूज तळावरील धावपट्टी उद्ध्वस्त झाली. यावेळी कर्णिक यांनी धाडसी निर्णय घेतला. त्यांनी आजूबाजूच्या गावातील महिलांकडे त्यांनी मदत मागितली. त्यांना तळाची बांधणी करण्यासाठी त्यांनी विनंती केली. यानंतर कर्णिक यांनी सुंदरबेन सहित ३०० महिलांच्या मदतीनं पुन्हा एअरबेस बांधला. कर्णिक यांनी घेतलेला धाडसी निर्णय आणि हवाई दलाचं योगदान याची शौर्यगाथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

या सिनेमात सुंदरबेनचा रोल सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) साकारणार आहे. याशिवाय संजय दत्त (Sanjay Dutt) हादेखील एक सामान्य नागरिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो युद्धादरम्यान भारतीय सेनेची मदत करताे. एक दोन दिवसांत संजयदेखील आपल्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

अजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो मैदान सिनेमात दिसणार आहे. यात त्यानं भारतीय फुटबॉल टीमचे कोच राहिलेले सय्यद अब्दुल रहीम यांचा रोल साकारला आहे. याशिवाय तो भुज : द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमातही दिसणार आहे. अभिषेक दुधैयानं याचं डायरेक्शन केलं आहे. याशिवाय आता त्याच्याकडे एस एस राजामौली यांचा RRR हा सिनेमादेखील आहे.

You might also like