…म्हणून तीनही खान फ्लॉप : अजय देवगण 

मुंबई : वृत्तसंस्था – २०१८ मध्ये सलमान, आमिर, शाहरूख या तीनही खानांची बॉक्स ऑफिसवर जादू काही चालली नाही. मागीलवर्षी  प्रदर्शित झालेले आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान या तीनही खानांचे चित्रपट धडाधड आपटले. आधी सलमान खान ‘रेस ३’ दणकून आपटला. यानंतर आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ फ्लॉप झाला. यापाठोपाठ आलेल्या शाहरूखच्या ‘झिरो’ चीही तीच गत झाली. या तीनही खानांचे हे बिग बजेट चित्रपट असे सपाटून आपटलेले पाहून अनेकांना धक्का बसला. मात्र अजय देवगनला याबाबत विशेष काही वाटले नाही. बाॅक्स आॅफिसवर नेहमीच हिट असणाऱ्या अजय देवगणने तीनही खानांचे चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण सांगितले आहे.

अजय देवगण म्हणाला की, ‘‘ठग्स’, ‘रेस ३’, ‘झिरो’ यापैकी एकाही चित्रपटाला कथा व्यवस्थित नव्हती. चित्रपट केवळ कथेमुळे यशस्वी होतो. कथाचं नसली तर प्रेक्षक चित्रपटाकडे फिरकत नाहीत. या तिन्ही चित्रपटांच्या बाबतीत हेच झाले. अजयच्या मते, निर्माता-दिग्दर्शकांनी या चित्रपटांच्या स्क्रिप्टवर काम केले असते तर हे तीनही चित्रपट हिट ठरले असते. अजय देवगण हा तसा रिझर्व्ह व्यक्ती म्हणून ओळखला जातो. मात्र तीनही खानांचे चित्रपट फ्लॉप होण्याबद्दल त्याने स्पष्ट मत मांडले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us