5 व्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’ची कोटींच्या कोटी उड्डाणे, 270 Cr पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित अभिनेता अजय देवगण याचा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा बॉक्स ऑफीस वरील कमाईचा आलेख वाढता वाढता वाढे असाच आहे. विशेष म्हणजे तब्बल ५ आठावडे उलटून गेले तरी देखील या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. केवळ तरुणाईचं नव्हे तर आबालवृद्धांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने २६९.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

हा चित्रपट १० जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित झाला होता. पाचव्या आठवड्यातही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाची घोडदौड अशीच सुरू राहिल्यास हा चित्रपट दंगल आणि पीके या चित्रपटांना मागं टाकेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. पाचव्या आठवड्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘तान्हाजी’ चित्रपटानं १.१५ कोटींची कमाई केली तर शनिवारी २.७८ कोटींचा गल्ला जमवला. रविवारी या चित्रपटानं ३.४५ कोटींचा व्यावसाय केला होता. कमाई अशीच सुरू राहिल्यास चित्रपट लवकरच ३०० कोटींचा टप्पा पार करेल यात शंका नाही.

3D चित्रपट आणि उत्तम VFX इफेक्ट चित्रपटाचे यश
छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. अभिनेता अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमनुसार दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने ४७.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचे हे विशेष आहे की हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे यश म्हणजे या चित्रपटात उत्तम VFX इफेक्ट वापरण्यात आले आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना हा चित्रपट पडद्यावर एक सर्वोत्तम अनुभव देऊन जातो.

तान्हाजी नंतर दर्जेदार चित्रपट नाहीच
‘मलंग’ आणि ‘शिकारा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ‘तान्हाजी’ च्या कमाईवर परिणाम होईलं असं वाटत होतं. परंतु या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची निराशा केल्याचं पाहायला मिळालं. ‘मलंग’ आणि ‘शिकारा’ या दोन्ही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.