अजयच्या वेडापायी लागले गुटख्याचे व्यसन, झाला कॅन्सर अन् आता म्हणतो…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण याने आपल्या अभिनयाने चाहत्याला वेड लावले आहे. त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहे. त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटातील भूमिकेला चाहत्यांनी दाद दिली आहे. इतकेच नव्हे तर त्याने केलेल्या प्रत्येक जाहिरातीला चाहत्यांनी उचलून धरले आहे. सध्या त्याच्या गुटखा तंबाखूच्या जाहीरातींना चाहते मनावर घेत आहे. चक्क त्याची जाहीरात पाहून लोकांनी स्वतःला व्यसन लावले आहे.

राजस्थानमध्ये राहणाऱ्या नानकराम हा अजयचा खुप मोठा चाहता आहे. तो चक्क अजयच्या जाहिराती पाहून व्यसनाच्या आहारी गेला आहे. असे मद्य, सिगारेट आणि तंबाखू-गुटखा यांसारख्या अंमली पदार्थाच्या जाहिराती करणे चुकीचे आहे. या प्रकारच्या समाजाला घातक असलेल्या पदार्थाच्या जाहिराती करु नये असे आवाहन एका वृत्तसंस्थेने केले आहे. नानकराम हे अजयचे मोठे चाहते आहे. त्यांनी अजयच्या तंबाखू उत्पादनाची जाहिरात पाहून या उत्पादनाचे सेवेन सुरु केले आहे. त्याचबरोबर त्यांना कर्करोग झाल्याचे सांगितले आहे.

नानकराम यांना दोन मुलं आहे. कर्करोग होण्यापुर्वी त्यांचे चहाचे दुकान होते. मात्र, आता कर्करोग झाल्यामुळे त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे ते सांगनेर परिसरात दुध विक्री करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहे.

नानकराम यांचा मुलगा दिनेश मीणा म्हणाले, की ‘माझे वडिल नानकराम मीणा हे अजयचे चाहते आहेत. त्यामुळे त्याचे प्रत्येक चित्रपट, जाहिराती आवडीने पाहत असतात. अजय देवगण गेल्या कित्येक काळापासून तंबाखूजन्य पदार्थाच्या जाहिराती करत आहे. हे पाहून माझ्या वडिलांनीही तंबाखू उत्पादनांचे सेवेन करण्यास सुरुवात केली. मात्र, काही काळातच त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यामुळे इतक्या मोठ्या कलाकाराने अशाप्रकारच्या जाहिराती करु नये, अशी विनंती आता माझे वडिल करत आहे.’