‘तान्हाजी’ ब्लॉकबस्टर ‘हिट’ ! ‘गोलमाल’नंतर अजयच्या टीमला ‘मालामाल’ करणारा 2 रा सिनेमा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा तान्हाजी : द अनसंय वॉरियर हा सिनेमा 10 जानेवारील रोजी रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहेत. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. सिनेमानं 150 कोटींचा आकडाही सहज पार केला आहे. अजून या सिनेमाची कमाई थांबायचं नाव घेत नाहीये. अजूनही सिनेमाची कमाई सुरूच आहे.

प्रसिद्ध समीक्षक आणि व्यापार तज्ज्ञ (ट्रे़ड एक्सपर्ट) तरण आदर्शनं ट्विट करत तान्हाजीच्या कमाईबद्दल माहिती दिली आहे. ट्विट करत तरण म्हणतो, “तान्हाजीचा दमदार दुसरा आठवडा. शनिवारी आणि रविवारी पुन्हा टॉपवर आहे. हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यात 200 कोटींची कमाई पार करू शकतो. तसं झाल्यास 2020 मधील हे पहिलं दुहेरी शतक असेल. तान्हाजीनं शुक्रवारी 10.06 कोटी, शनिवारी 16.36 कोटी, रविवारी 22.12 कोटी अशी एकूण 167.45 कोटींची कमाई केली आहे.

तान्हाजी बेंचमार्क-

50 कोटी पार- दिवस 3
100 कोटी- 6 वा दिवस
125 कोटी- 8 वा दिवस
150 कोटी- 10 वा दिवस

तान्हाजी सिनेमानं टोटल धमालला मागे टाकलं आहे. गोलमालनंतर सर्वाधिक कमाई करणारा हा अजय देवगणचा दुसरा सिनेमा ठरला आहे. तान्हाजी हा सिनेमा सैफ अली खान आणि काजोल यांच्या सिनेमांपैकी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –