अजय देवगणचा ‘हा’ चित्रपट बनणार नाही

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने काही दिवसापूर्वी ‘बॅटल ऑफ सारागढी’ वर आधारित चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे नाव ‘सन ऑफ सरदार 2’ असे होते. पण आता हा चित्रपट बनवण्याचा विचार अजयने सोडला आहे. याची माहिती खुद्द अजयने दिली. सध्या अजय ‘टोटल धमाल’ चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये अजयने  याचा खुलासा केला आहे.

आमची टीम ब-याच दिवसांपासून ‘सन ऑफ सरदार 2’ वर काम करत होती. पण चित्रपटाची कल्पना जमून आली नाही. त्यामुळे आम्ही या चित्रपटाचा इरादा सोडून दिला. त्याजागी आम्ही ‘तानाजी-द अनसंग वॉरियर’ बनवण्याचा निर्णय घेतला, असे अजयने सांगितले.

या चित्रपटाची कथा सारागढीच्या युद्धावर आधारित होती. या युद्धात केवळ २१ शिख सैनिकांनी १० हजार अफगाणी सैन्याला सळो की पळो केले होते. अजयला ‘सन ऑफ सरदार 2′ चित्रपट व्हीएफएक्स तंत्राने भव्यदिव्य रूपात बनवण्याची इच्छा होती. याशिवाय या चित्रपटाची कल्पना रद्द करण्यामागे आणखी एक कारण असू शकते ते म्हणजे, अक्षयचा ‘केसरी’ चित्रपट अक्षयचा हा चित्रपट सुद्धा सारागढी युद्धावर आधारित आहे, आणि लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळेच कदाचित अजयला एकाच विषयावर आधारित दोन चित्रपटाची निर्मिती करणे योग्य वाटलं नसेल म्हणूनच त्याने हा चित्रपट बवण्याचा विचार थांबवून त्या चित्रपटाच्याऐवजी ‘तानाजी’ चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.