51 व्या वाढदिवसानिमित्त अज यदेवगणकडून बॉलिवूडच्या ज्युनियर आर्टीस्ट्सला 51 लाखांची भेट ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार अजय देवगण आज आपला 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजयनं अनेक ज्युनियर आर्टीस्ट आणि डेली वेजेसवर काम करणाऱ्या वर्कर्ससाठी मोठी भेट दिली आहे. अजय देवगणनं डेली वेजेसवर काम करणाऱ्यांसाठी 51 लाख डोनेट केले आहेत. याआधी डायरेक्टर रोहित शेट्टीनंही इंडस्ट्रीत डेली वेजेसवर काम करणाऱ्या वर्कर्ससाठी 51 लाख डोनेट केले आहेत. अजयनं ही रक्कम फेडरेशन ऑफ वेस्टर्नस इंडिया सिने एम्प्लॉईजला डोनेट केली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्नस इंडिया सिने एम्प्लॉईजचे जनलर सेक्रेटकरी अशोक पंडित यांनी याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी(दि 1 एप्रिल 2020) अजयनं 51 लाखांची मदत केल्याचं त्यांनी सांगितलं

सध्या जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी सध्या देशात 21 दिवसांचा लॉकाडाऊनही जारी करण्यात आला आहे. सध्य सर्व जनता घरात बसून आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पूर्ण देश एकत्र येऊन लढताना दिसत आहे. लॉकडाऊनचा सर्वात जास्त त्रास हा डेली वर्कर्सना होताना दिसत आहे. त्यामुळं बॉलिवूडमधील डेली वर्कर्सची मदत करण्यासाठी सध्या बॉलिवूड कलाकार पुढे येताना दिसत आहेत.

अलीकडेच अशी बातमी समोर आली होती, बॉलिवूड स्टार सलमान खान यानं डेली वेजेसवर काम करणाऱ्या 25000 हजार कर्मचाऱ्याची जबाबदारी घेतली आहे. रोहित शेट्टीनंही त्यांना मदतीचा हात दिला आहे.