शिववंशीय दशनाम गोसावी समाज संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजिंक्य गोसावी

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – शिववंशीय दशनाम गोसावी समाज संस्थेच्या वतीने अजिंक्य चंद्रकांत गोसावी यांची दौंड तालुका युवा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी दौंड चे आमदार राहुल कुल आणि शिववंशीय दशनाम गोसावी समाज संस्थेचे अध्यक्ष महेंद्र गोसावी यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी गोसावी समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते.

अजिंक्य गोसावी यांचा सामाजिक कार्यामध्ये मोठा सहभाग असतो. त्यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाजाच्या इनाम जमिनी, मठांचे प्रश्न मार्गी लावणे. तसेच दफनभूमीचा प्रश्न सोडविणे. आदी प्रमुख कामे करण्यावर भर राहणार असून समाजातील तरुणांचे संघटन मजबूत करण्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आरोग्यविषयक वृत्त-

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like