अजिंक्य रहाणेला बारा लाखांचा दंड

मुंबई : वृत्तसंस्था

आयपीएल मॅचेसची देशभर धूम सुरु आहे. राजस्थान रॉयल्सने वानखेडेवरच्या सामान्यात मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलमधले आपले आव्हान कायम राखले. पण या सामन्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेला मात्र कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या कालच्या (रविवार) सामन्यात राजस्थान रॉयल्सने षटकांची गती न राखल्याने कर्णधार अंजिक्य रहाणेला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने कर्णधार अजिंक्य राहणेला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. असे आयपीएल पत्रकात म्हंटले आहे. दरम्यान, राजस्थानकडून झालेल्या पराभवाने मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला धोका निर्माण झाला आहे. राजस्थानच्या या विजयाचा जॉस बटलर प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने ५३ चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद ९४ धावांची खेळी उभारली. बटलरचे यंदाच्या मोसमातील हे पाचवे अर्धशतक ठरले.