Rahane Exclusive : कसोटी कर्णधारपदावर उघडपणे बोलला अजिंक्य रहाणे, म्हणाला – ‘विराट आणि माझ्यात कसलीही स्पर्धा नाही’

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाला 2-1 ने टेस्ट सीरीजमध्ये विजय मिळवून देणार्‍या अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane ) कर्णधार पदाचे सर्वत्र कौतूक होत आहे. अ‍ॅडलेडमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध दुसर्‍या डावात अवघ्या 36 धावांवर ऑलआऊट झाली होती. कांगारू टीमने अडीच दिवसाच्या आत भारताला 8 विकेटने मात देत सीरीजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली होती.

टेस्ट कर्णधार पदावरून झाला होता वाद
विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध टेस्ट सीरीज मध्येच सोडून भारतात परतला होता, परंतु कोहलीच्या ठिकाणी कर्णधार पद सांभाळणार्‍या अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियन माईंड गेमवर मात करत टीमला पुन्हा उभे केले होते. टीम इंडियाने रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्नमध्ये पुन्हा जबरदस्त पदार्पण केले होते. तसेच अजिंक्य रहाणेने टीम इंडियाचे नेतृत्व करत मेलबर्नमध्ये शानदार शतक ठोकले होते. रहाणेने टीम इंडियाला कागारुंवर 8 विकेटने धमाकेदार विजय मिळवून दिला.

रहाणेने केले मोठे वक्तव्य
भारत आणि परदेशातील अनेक माजी क्रिकेटर्सने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे कौतूक केले आणि त्याला विराट कोहलीच्या ठिकाणी कायमस्वरूपी कर्णधार करण्याची मागणी केली आहे, परंतु रहाणेचे मत एकदम वेगळे आहे. अजिंक्य रहाणेचे म्हणणे आहे की, कर्णधार पदावरून त्याच्यात आणि कोहलीत कोणतीही स्पर्धा नाही.

कोहलीशी कोणतीही स्पर्धा नाही
’आजतक’ सोबत एक्सक्लूझिव्ह चर्चेत रहाणेने म्हटले, टेस्टमध्ये कर्णधार पदावरून माझ्यात आणि विराटमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. जेव्हा विराट कर्णधार असतो तेव्हा त्याचा हेतू असतो टीम इंडियाला विजय मिळवून देणे. जेव्हा मी कर्णधार झालो तेव्हा मी सुद्धा तेच केले.

कर्णधारपद नव्हे केवळ विजय मिळवण्याचे उद्दीष्ट
अजिंक्य रहाणेने म्हणाला, आम्हाला दोघांना केवळ टीम इंडियाला विजय मिळवून द्यायचा आहे. भले कर्णधार कुणीही असो. अशीही कर्णधार पदावरून आमच्या दोघांमध्ये कोणतीही कॉम्पिटिशन नाही. इंग्लंडच्या विरूद्ध विराट कोहली पुन्हा एकदा टीम इंडियाची सूत्र सांभाळेल आणि मी उप कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळेन. अशाप्रकारे आमच्या सर्वांची इच्छा आहे की टीम इंडियाला विजय मिळावा, मग कर्णधार कुणीही बनावे.

ऋषभ पंतला नॅचरल गेम खेळायला सांगितले
अजिंक्य रहाणेने ऋषभ पंतच्या चांगल्या फलंदाजीवर सुद्धा खुलासा केला आहे. सिडनी (97) आणि ब्रिस्बेन (नाबाद 89) मध्ये ऋषभ पंतच्या चांगल्या खेळी बाबत अजिंक्य रहाणेने चर्चा केली. रहाणे म्हणाला, ऋषभ पंतला सांगितले होते की, केवळ आपला नॅचरल खेळ कर आणि बाकीच्या गोष्टींची चिंता करू नकोस. जसा तु खुलून बॅटिंग करतोस तसाच खेळ.