अजितदादा अजूनही शांत नाहीत, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं सूचन विधान

कऱ्हाड, पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार यांनी भाजपबरोबर जाऊन सत्तास्थापना केल्यानंतर बरीच टीका झाली. त्यानंतर पुन्हा त्यांनी घरवापसी केली आणि राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. असे असले तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पक्षात अस्वस्थ होते. त्यामुळे ते भाजपकडे आले होते. म्हणूनच सत्ता स्थापन केली. परंतु त्यांची अस्वस्थता कायम राहिली आहे.

अजित पवारांनी पुन्हा परत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी ते अजूनही शांत नाहीत असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. यावेळी ते कऱ्हाड येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी कऱ्हाड नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकूंद चरेगावकर हे उपस्थित होते.

माधव भंडारी म्हणाले की अजित पवारांना आम्ही कोणताही शब्द दिला नव्हता. तेच आमच्याकडे आले होते. अजित दादांना आम्ही जेवढे ओळखतो त्यावरुन ते बोलतात एक आणि करतात दुसरे असा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे त्यांनी जे निर्णय घेतले त्याबाबत तेच तुम्हाला चांगले उत्तर देतील.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/