अजित देशमुख यांची पुणे महापालिकेत उपायुक्तपदी बदली

पुणे : सोलापूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांची प्रतिनियुक्तीवर पुणे महापालिकेत तीन वर्षांसाठी उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज पुण्यात पदभार स्वीकारणार आहेत.

राज्याच्या महसूल व वन विभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी हा आदेश काढला आहे. महापालिकेत प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठविण्याऐवजी पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांनाच उपायुक्तपदी नेमणूक करावी, अशी मागणी पुण्यातील नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार पीएमपीच्या अध्यक्षपदी राजेंद्र जगताप यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. मात्र, त्यानंतर आता पुन्हा उपायुक्तपदी प्रतिनियुक्तीवर अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात येत आहे. उपायुक्त पदावरील प्रतिनियुक्तीच्या अनुषंगाने अजित देशमुख यांच्या सेवा प्रधान सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय यांच्याकडे सूपूर्द करण्यात आल्या आहेत.
अजित देशमुख हे आज पुणे महापालिकेत पदभार स्वीकारणार आहेत.