…म्हणून ‘एससीओ’च्या परिषदेतून अजित डोभाल यांनी केला ‘सभात्याग’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (एनएसए) परिषदेतून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सभात्याग केला. भारताचा भूप्रदेश हा पाकिस्तानचा भाग असल्याचे दर्शविणार्‍या खोट्या नकाशाचा वापर पाकिस्तानने केल्याने त्यांनी सभात्याग केला.

व्हिडिओ कॉन्परन्सद्वारे ‘एससीओ’च्या सुरक्षा सल्लागारांची बैठक सुरू होती. त्यात पाकिस्तानचे मोईद युसूफ यांनी जम्मू-काश्मीर हा वादग्रस्त भाग असल्याचे दाखवणारा नकाशा प्रदर्शित केला. त्याचा निषेध करत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सभात्याग केला, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

पाकिस्तानने या कृतीद्वारे यजमान रशियाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केला. त्यामुळे रशियाशी चर्चा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले, असे श्रीवास्तव यांनी सांगितले. त्यानंतर पाकिस्तानने अपेक्षेप्रमाणे बैठकीबाबत दिशाभूल केली, असेही ते म्हणाले. डोभाल यांनी केलेल्या सभात्यागामुळे बैठक अर्ध्यावर थांबविण्यात आली होती.