अजित डोवालांचा खास ‘प्लॅन’, ‘दहशतवाद’ संपवण्यासाठी ‘काश्मीर’मध्ये राबवणार विशेष ‘अभियान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गुरुवार सांगितले की दहशतवादी विरोधी कारवाया रोखण्यासाठी अभियान आता वेगवान करायचे आहे. तसेच जम्मू काश्मीरमधील लोकांचे जीवन सुधारावे यासाठी काम करण्यात येईल.

अधिकाऱ्याने सांगितले की बुधवारी श्रीनगरमध्ये आलेल्या डोवाल यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या दरम्यान हे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले की दहशतवाद्यांमुळे भयभीत झालेल्या सामान्य नागरिकांचे दैंनदिन जीवन सोयीस्कर कसे करता येईल.

अजित डोवाल यांची खोऱ्यातील दूसरा दौरा
370 कलम रद्द करण्यात आल्यानंतर अजित डोवाल यांचा काश्मीर खोऱ्यातील दूसरा दौरा आहे. दोन्ही केंद्रशासित क्षेत्र 31 ऑक्टोबरला अस्तित्वात येतील आणि त्यानंतर दोन्ही केंद्रशासित प्रदेशात उपराज्यपाल शपथ घेतील.

बैठकीत अजित डोवाल यांनी विकास योजनांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सांगितले की, काश्मीरमधील दैनदिन जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी वेगाने प्रयत्न करा. यात लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा, काश्मीर खोऱ्यात बाहेरुन भाज्या, फळ आणणे याचा देखील समावेश आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी विरोधी कारवाया रोखण्यासाठी अभियान आता वेगवान करायचे आहे. तसेच जम्मू काश्मीरमधील लोकांचे जीवन सुधारावे यासाठी काम करण्यात येईल. डोवाल यांनी चेतावणी दिली की दहशतवादी विरोधात कारवाई अभियानात काळजी घेतली पाहिजे की नागारिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. हे पाऊल त्यानंतर उचलण्यात आले की, दहशतवादी नागरिकांचे तसेच सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान करत आहे.

370 कलम रद्द केल्यानंतर एनएसएनी पहिला दौरा 11 दिवसांचा केला होता. या दरम्यान डोभाल यांनी निश्चित केले की, सरकारने हा निर्णय घेतल्यावर तेथील परिस्थिती काय आहे. राज्यातील दैनंदिन दिवसांची देखील पाहणी करण्यात आली आणि हे सुनिश्चित केले की राज्यात नियंत्रण रेषेवर तैनात सुरक्षा दल आणि अंतर्गत भागात असलेले सुरक्षा दल यांच्या ताळमेळ कसा करता येईल.

Visit : policenama.com